टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यास संतोषला हवे बळ!

टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यास संतोषला हवे बळ!

कोल्हापूर - भारतीय मूकबधीर क्रिकेट संघात निवड झालेल्या संतोष चंद्रकांत मिठारी याचे ग्रीसमध्ये टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे स्वप्नच राहण्याची शक्‍यता आहे. बेताच्या परिस्थितीमुळे एक लाख ५० हजार रुपये जमा कसे करायचे, असे आव्हान त्याच्यासमोर आहे. ग्रीसमध्ये २०१६ मध्ये त्याला केवळ पैसे नसल्यामुळे जाता आले नव्हते. आता पुन्हा त्याची संधी हुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी समाजातील दातृत्वाला पाझर फुटणार का, हाच प्रश्‍न आहे. 

संतोष कसबा बावड्यातील हनुमान गल्लीत राहतो. त्याची २६ सप्टेंबर २०१६ ला ग्रीसमधील क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. हाती पैसे नसल्याने त्याला तेथे जाता आले नव्हते. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन ऑफ द डेफतर्फे त्याची पुन्हा भारतीय मूकबधिर क्रिकेट संघात निवड झाली आहे.

ग्रीसमधील कॉर्फ्यु येथे हेलेनिक प्रीमिअर लीग टी-२० क्रिकेट सिनियर क्रिकेट स्पर्धा ३० सप्टेंबर ते ७ ऑक्‍टोबर दरम्यान होत आहे. स्पर्धेसाठी त्याला एक लाख ५० हजार रुपये इतका खर्च आहे. संतोषने पेंटिंगचा डिप्लोमा केला आहे. त्याचे वडील चंद्रकांत मिठारी उद्यमनगरात मायक्रोमेटल इंडस्ट्रीमध्ये जॉब वर्कर म्हणून काम करतात. महिन्याकाठी त्यांना नऊ हजार रुपये मिळतात. मुलाला ग्रीसला जाता यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. संतोष भारतीय संघाकडून तिसऱ्या आशिया मूक-बधिर क्रिकेट कप स्पर्धेत खेळला आहे. स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला होता. या संघाचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कारही झाला होता.

ग्रीसमध्ये मुलाने खेळावे, हीच इच्छा आहे. बेताच्या स्थितीमुळे त्याला यापूर्वी ग्रीसला जाता आले नव्हते. 
- चंद्रकांत मिठारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com