दिलबहार हरता हरता जिंकले

संदीप खांडेकर
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ)  प्रॅक्टिस फुटबॉल (ब) क्लबविरुध्द आज हरता हरता जिंकले. दिलबहारने प्रॅक्टिसवर टायब्रेकरमध्ये ४ विरुद्ध २ गोलफरकाने मात  केली. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

प्रॅक्टिसच्या रजत जाधवने  ७ व्या मिनिटाला गोल नोंदवून दिलबहारला धक्का दिला. उत्तरार्धात रोहित भोसलेने ७१ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर दिलबहारचे खेळाडू पुन्हा हडबडले. तत्काळ आपला खेळ सावरत त्यांनी प्रॅक्टिसची बचावफळी भेदली. त्यांच्या निखिल जाधवने ७३ व्या मिनिटाला गोल केला. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना प्रॅक्टिसच्या खेळाडूच्या हातास चेंडूचा स्पर्श झाला. त्यामुळे दिलबहारला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर निखिल जाधवने गोल नोंदवून संघाला बरोबरी साधून दिली.

टायब्रेकरवर दिलबहारकडून पवन माळी, सचिन पाटील, निखिल जाधव, अनिकेत तोरस्कर यांनी गोल केला. करण चव्हाण बंदरे गोल करण्यात अपयशी ठरला. प्रॅक्टिसकडून सुमित कदम व चेतन डोंगरे यांनी गोल केला. रोहित भोसले व ओमकार भुरके यांना गोल करता आला नाही.

Web Title: Kolhapur News Satej Chashak Football competition