पाटाकडील तालीम मंडळाची (अ) साईनाथ स्पोर्ट्सवर ४-० ने मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने (अ) साईनाथ स्पोर्ट्सवर ४-० ने मात करत साखळी फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

ऋषिकेश मेथे-पाटीलने चौथ्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून आपले इरादे स्पष्ट केले. साईनाथच्या बचावफळीला त्याला रोखणे जमले नाही. त्याने ४७ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदविल्यानंतर मध्यफळीत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या वृषभ ढेरेने ६४ व्या मिनिटाला चेंडूस गोल जाळीची दिशा दाखवली. ऋषिकेशने ६८ व्या मिनिटाला संघाचा चौथा तर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

Web Title: Kolhapur News Satej Football competition