सात वचने घेऊन इचलकरंजीत सत्यशोधक पद्धतीने विवाह

राजेंद्र होळकर
रविवार, 27 मे 2018

इचलकरंजी - आगळा-वेगळा आणि समाजसुधारकांनी घालुन दिलेल्या विचारांच्या मार्गावरील सत्यशोधकी विवाह सोहळा इचलकरंजीत आज मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पश्‍चिम महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील पहिला होय.

इचलकरंजी - आगळा-वेगळा आणि समाजसुधारकांनी घालुन दिलेल्या विचारांच्या मार्गावरील सत्यशोधकी विवाह सोहळा इचलकरंजीत आज मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पश्‍चिम महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील पहिला होय.
या विवाह समारंभामध्ये नवदाम्पत्याना राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, उमा पानसरे, भालचंद्र कागो, मेघा सावंत, आनंद मेंणसे, स्मिता पानसरे या सात व्यक्तीनी सात वचने दिली.

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आप्पा पाटील व सचिव (त्यांची पत्नी) जयश्री पाटील या दाम्पत्याचा मुलगा अनिकेतचा विवाह नागाव (निमणी) ता. तासगाव, जि. सांगली येथील नागनाथ आडके यांची मुलगी स्वप्नाली हिच्याबरोबर ठरला. त्याचबरोबर हा विवाह समारंभ धार्मिक परंपरेला फाटा देवून पुरोगामी विचाराने व सत्यशोधक पध्दतीने करण्याचा निर्णय पाटील दाम्पत्याने घेतला. याला मुलीच्या नातेवाईकांच्याबरोबर नववधू-वरांनी सहमती दर्शविली. त्यावरुन आज इचलकरंजी येथील पंचरत्न सांस्कृतिक हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला सामाजिक व राजकीय आणि शैक्षणीक क्षेत्रातील अनेक मंडळीनी उपस्थिती लावली होती.

अक्षता ऐवजी पुष्पवृष्टी

या सत्यशोधकी विवाह समारंभामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या डोक्‍यावर अक्षता न टाकता पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
 

Web Title: Kolhapur News SatyaShodhak Marriage in Ichalkaraji