शाळकरी मुलाचे पाच लाखांसाठी अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

कुरुंदवाड - घरातून पाच लाख रुपये घेऊन ये; अन्यथा वडिलांना ठार मारण्याची धमकी देत पाच लाख रुपये घेऊन शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना शिरढोण (ता. शिरोळ) येथे आज घडली. अपहृत मुलाला सोडून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कुरुंदवाड - घरातून पाच लाख रुपये घेऊन ये; अन्यथा वडिलांना ठार मारण्याची धमकी देत पाच लाख रुपये घेऊन शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना शिरढोण (ता. शिरोळ) येथे आज घडली. अपहृत मुलाला सोडून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिंटू ऊर्फ उमेश भिमगोंडा हावगुंडे (वय ३५, शिरढोण) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद किशोर जंबू माणगांवे यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली. दरम्यान, संशयित उमेश हावगुंडे याला अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी किशोर माणगावे यांच्या मुलाला संशयित हावगुंडे याने रविवारी (ता. २५) पाच लाख रुपये घेऊन ये, नाही तर वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. मुलाने आज सकाळी घरातील पाच लाख घेऊन हावगुंडेला दिले. हावगुंडेने रोकड मोपेडच्या डिग्गीत ठेवून मुलासह इचलकरंजीत गेला. पुन्हा सांयकाळी मुलास शिरढोणमध्ये सोडले. मुलगा घरी आल्यानंतर याबाबत घरच्यांना सांगितले. घटनेची फिर्याद कुरुंदवाड पोलिसांत दिली. पोलिसांनी संशयित हावगुंडेला अटक केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. बी. शिंदे करीत आहेत.

Web Title: Kolhapur News School boy kidnapped for five lakhs