सुरक्षारक्षकाचे वेतन अन्‌ ३ महिने थांब

शिवाजी यादव
गुरुवार, 8 जून 2017

महापारेषण, सुरक्षारक्षक मंडळाचे एकमेकांकडे बोट

कोल्हापूर - जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातर्फे महापारेषण कंपनीकडे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना वेतन तीन ते चार महिन्यांनंतर मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून विलंब होत असूनही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे यावरून दिसते. 

महापारेषण, सुरक्षारक्षक मंडळाचे एकमेकांकडे बोट

कोल्हापूर - जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातर्फे महापारेषण कंपनीकडे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना वेतन तीन ते चार महिन्यांनंतर मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून विलंब होत असूनही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे यावरून दिसते. 

वेतन विलंबाबाबत महापारेषणकडून वेळेत बिले मिळत नाहीत, तर सुरक्षारक्षक मंडळाकडून महापारेषणला वेळेत बिले सादर केली जात नाहीत, असा आरोप दोन्ही बाजूने केला जात आहे. सुरक्षारक्षकांच्या पदरी मात्र प्रतीक्षाच पडत आहे.   महापारेषणकडे सुमारे २२५ सुरक्षारक्षक काम करतात. त्यांच्या नियुक्‍त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून झाल्या आहेत.

सुरक्षारक्षकाचे वेतन जानेवारीचे वेतन ३ मे ला झाले तर उर्वरित महिन्याचे वेतन अद्यापही  मिळालेले नाही.अनेक सुरक्षारक्षकांना   पीएफ मिळतो की नाही, याविषयी निश्‍चित माहिती नाहीत, तर त्यांना फीएफचा नंबर दिलेला नाही.  काही सुरक्षारक्षक वेतनाबाबत कार्यालयात विचारना करतात ‘लवकरच होईल’ ‘बिले मंजूर होताच वेतन दिले जाईल’ असे सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्ष  तीन महिने झाले तरी वेतन मिळत नाही, अशी स्थिती आहे. 

मंडळाच्या सुरक्षारक्षकांनी गतवर्षी जोतिबा डोंगर याठिकाणी काम  केले होते, त्याचे वेतन अद्याप मंडळाकडून मिळालेले नाही. याबाबत कांही सुरक्षारक्षकांनी सुरक्षारक्षक मंडळाकडे विचरना केली असता  कामगार आयुक्तांची सही झालेली नाही,  देवस्थान समितीची सही झालेली नाही, अशी कारणे सांगितली.     

दरम्यान, याबाबत सुरक्षा मंडळांशी संपर्क साधला तेव्हा तेथील निरीक्षक म्हणाले ‘‘महापारेषणकडून बिले मिळण्यास विलंब होतो, त्यामुळे सुरक्षारक्षकांचे वेतन देण्यात विलंब होतो. सुरक्षारक्षकांच्या नावे बॅंकामध्ये ठेवही ठेवण्याची सुविधा आहे, पण पीएफ देण्याचे बंधन नाही.’’

Web Title: kolhapur news security salary waiting on 3 month