#MarathaKrantiMorcha सेनापती कापशी ते कोल्हापूर लॉंगमार्च

प्रकाश कोकितकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सेनापती कापशी - 'एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत चिकोत्रा खोऱ्यातील तरुणांनी आज सकाळी लाँगमार्च सुरु केला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या कोल्हापुरातील दसरा चाैक येथील ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी हा लाँगमार्च काढण्यात आला आहे. 

सकाळी आठ वाजता शशिकांत खोत आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तरुणांनी या लाँगमार्चला सुरवात केली. कोणत्याही पक्ष अथवा जाती धर्माचा विचार न करता परिसरातील सुमारे  550 तरुणांनी यात सहभाग घेतला आहे. मांगनूर पासून आलाबादपर्यंत आणि माद्याळपासून कापशी पर्यंतच्या सर्व गावातून लोक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत आहेत. बाळीक्रे, मुगळी, जैन्याळ, लिंगनूर येथीलही ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवून आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. 

Web Title: Kolhapur News Senapati Kapshi to Kolhapur Longmarch