कोल्हापूरः तक्रार देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पोलिस ठाण्यात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : चोरीची फिर्याद देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पोलिस ठाण्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घडली.

कोल्हापूर : चोरीची फिर्याद देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पोलिस ठाण्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावड्याहून कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकाच्या डिस्चार्ज साठी आलेले बंडा बाळकू पाटील (वय ७०) रोख रक्कम व काही सोन्याचे दागिने घेऊन रंकाळा बस स्थानकावर आले असता त्यांच्या बॅग मधील ऐवज चोरीस गेला. याची तक्रार दाखल करण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे खाली कोसळले. उपचारासाठी सीपीआर मध्ये नेण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित केले.
 
परिसरात उलट सुलट चर्चा
सदरची घटना नेतेवाइकांना समजताच त्यांनी सीपीआर परिसरात गर्दी केली. या वेळी पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे आणि फिर्याद देण्यास आलेल्यानांच अरेरावी केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

Web Title: kolhapur news senior citizen Death of police station