शाळेला शहीद जवान मानेंचे नाव देण्यावरून घोळात घोळ...

प्रमोद फरांदे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान सावन माने यांच्या कुटुंबीयांची राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाच्या पूर्ततेसाठी फरफट सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेला ‘शहीद सावनकुमार बाळकू माने’ असे नाव देण्याचा ठराव केला; मात्र शासनाकडे मार्गदर्शन मागताना पत्रातच चुका केल्या.

एका पत्रात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तेस भविष्यात कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याबाबत असा उल्लेख करून मार्गदर्शन मागविले; तर सुधारित दुसऱ्या पत्रात शहीद सावन माने यांच्या नावाऐवजी शहीद बाळकू माने असा उल्लेख केल्याने जि.प.च्या गलथान कारभारातील घोळ उघड झाला आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर २२ जूनला हल्ला चढवून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न गोगवे (ता. शाहूवाडी) येथील जवान सावन माने यांनी हाणून पाडला. छातीचा कोट करून ते लढले आणि त्यांनी शत्रूला आत घुसू दिले नाही, यावेळी त्यांना वीरमरण आले. शहीद माने यांच्या कुटुंबाला सैनिकांचा वारसा आहे. वडील सैन्य दलात होते. भाऊही सैन्य दलात कार्यरत आहेत. शहीद सावन माने यांचे देशप्रेम अभिमानास्पद, आदर्शवत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी गोगवेला भेट देऊन शहीद सावन माने यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. त्याचवेळी माने कुटुंबीयांना जमीन देण्याचे, व्यायामशाळा, सभागृह बांधण्याचे आश्‍वासन दिले. पण त्याची पूर्तताच झालेली नाही. जि.प.ने प्राथमिक शाळेला शहीद सावन माने यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आणि ११ जुलै २०१७ च्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत तसा सर्वांनुमते ठरावही झाला. 

ग्रामपंचायतीकडून ठरावाद्वारे शाळेला शहीद सावन माने यांचे नाव द्यावे, अशा ठरावाद्वारे मागणी केली; मात्र शाळेला नाव देण्यास शासकीय नियमांचा अडथळा ठरत असल्याचे समोर आले. ५ मे २००४ च्या शासकीय निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तांना कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई केल्याने शाळेला नाव देणे प्रलंबित राहिले आहे.
विशेष म्हणजे, याबाबत जिल्हा परिषदेने शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे मार्गदर्शनाबाबत पत्रव्यवहार केला; मात्र पत्रव्यवहाराच्या विषयामध्येच चूक केली.

जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविलेल्या दोन्ही पत्रांतून कर्मचारी, अधिकारी निष्काळजी आहेत, हे दिसून येते. पहिल्या पत्रातील चूक लक्षात आणून देऊनही त्यांनी दुसऱ्या पत्रात चूक केली. शाळेस शहीद सावन माने यांचे नाव न दिल्यास जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणास बसणार आहे. 
- शिवाजीराव परुळेकर, 

अध्यक्ष, माजी सैनिक कल्याण समिती

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तेस भविष्यात कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याबाबत चक्क असा उल्लेख करून मार्गदर्शन मागविले आहे. ही चूक माजी सैनिक संघटनेने लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाने ६ फेब्रुवारीला मार्गदर्शन मागविणारे दुसरे पत्र पाठविले. या पत्रामध्येही शहीद जवान सावन यांच्या नावाऐवजी वडिलांना शहीद करण्याचा प्रकार जि. प.च्या शिक्षण विभागाने केला. या पत्राच्या विषयात शहीद बाळकू माने यांचे नाव प्राथमिक शाळेस देण्यासाठी मान्यता देण्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने हे पत्र पाठविले आहे. 

Web Title: Kolhapur News Shahid Jawan Sawan Mane name to shool issue