पुष्पा भावे यांना यंदाचा शाहू पुरस्कार 

संभाजी गंडमाळे
सोमवार, 18 जून 2018

कोल्हापूर - स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा जपणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहिर झाला आहे. याबाबतची घोषणा आज राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली. दरम्यान, 26 जूनला राजर्षी शाहू जयंतीदिनी पुरस्काराचे वितरण होईल. 

मराठीतील एक विचारवंत लेखक आणि प्रभावी वक्तृत्वाबरोबरच त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या प्रा. भावे यांच्या आजवरच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने गौरविले जाईल. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी त्यांचा संपर्क होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समिती, स्त्रीवादी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीतही त्या सक्रीय आहेत. 

Web Title: Kolhapur News Shahu Award to Pushpa Bhave