शालिनी सिनेटोन भूखंडावर आरक्षणाबाबत ५७५ सूचना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - शालिनी सिनेटोन भूखंडावर पूर्वीप्रमाणे आरक्षण टाकण्याबाबत नागरिकांकडून आलेल्या ५७५ सूचना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

कोल्हापूर - शालिनी सिनेटोन भूखंडावर पूर्वीप्रमाणे आरक्षण टाकण्याबाबत नागरिकांकडून आलेल्या ५७५ सूचना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

शालिनी सिनेटोनचे आरक्षण कायमस्वरूपी करण्याबाबत शासनाच्या नगर रचना विभागाने हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार या सूचना नागरिकांकडून दाखल झाल्या आहेत. एकूण ५४ एकर जागेत सध्या प्लॉटिंग झाले आहे. उर्वरित सात एकरचा परिसर आहे. तो शालिनी सिनेटोनसाठी राखीव आहे. जागा मोक्‍याची असल्याने त्यावरील आरक्षण उठविण्याचा प्रयत्न झाला.

महानगरपालिका विकास आराखड्यात त्या जागेवर कायमस्वरूपी आरक्षण टाकणार आहे. त्यादृष्टीने या सूचना मागविल्या होत्या. प्राप्त झालेल्या एकूण ५७५ सूचना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आज पालिका प्रशासनाच्या स्वाधीन केल्या.

राजारामपुरी नगररचना विभागाचे अधिकारी अरुणकुमार गवळी यांच्याकडे महामंडळातर्फे उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाहक रणजित जाधव यांनी या सूचना दिल्या. या वेळी संचालक सतीश बिडकर, माजी कार्यवाहक ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, अर्जुन नलवडे, अरुण भोसले-चोपदार, सुरेंद्र पन्हाळकर, स्वप्नील पार्टे, बबलू वडणगेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Shalini Cinestone issue