साखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार

सचिन सावंत 
सोमवार, 23 एप्रिल 2018

कोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक होणार आहे, असे माजी केंद्रीयकृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले.  

श्री. पवार म्हणाले,  पुढील वर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे दिसते आहे. देशात तयार होणाऱ्या साखर पैकी 35 टक्के साखर खाण्यासाठी वापरली  जाते. बाकीची साखर खासगी कंपन्यांसाठी जाते. यात शक्य झाले तर खासगी कंपन्याना कर बसावा. 

शेतकऱ्याची स्थिती खूप बिकट झाली आहे. या परिस्थितीला शेतकरी नेत्यांची नावे लिहून आत्महत्या करत आहेत.

- शरद पवार

राजकिय घडामोडीवर बोलताना श्री पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शक्य झाल्यास निवडणूक एकत्र लढतील. भाजपला फायदा होणार नाही याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. 

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना श्री. पवार म्हणाले, चंद्रकांतदादा काय बोलतात त्यांच्या बद्धल न बोललेच बरे. मुख्यमंत्री नागपूरचे असले तरी सगळे निर्णय कोल्हापूर  मधूनच होतात. कोल्हापूर हे सत्तेचे उपकेंद्र झाले आहे. मुख्यमंत्र्यांना माहीत नसलेल्या गोष्टीही ते जाहीर करून टाकतात. आयुष्यात माणसाला एखादी गोष्ट कधीतरी मिळाली की सकाळ, दुपार, संध्याकाळ तो काही बोलत सूटतो असे त्यांचे झाले आहे. आता त्यांनी एकदा थेट निवडणूक लढवून दाखवावी म्हणजे त्यांना लोकांकडून अजून काही चांगले शिकायला मिळेल

नाणार प्रश्नावर बोलताना श्री पवार म्हणाले की, नाणारमुळे कोकणचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाणारला 10 मे रोजी भेट देणार आहे. असेही ते म्हणाले. 

Web Title: Kolhapur News Sharad Pawar Comment