कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची नावे जाहीर करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शासनाच्या कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नावे जाहीर करा, या मागणीसाठी आज शिवसेनेच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. "जय भवानी, जय शिवाजी', "कर्जमाफी कसली, फसवी फसवी' यासारख्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी या कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व उपजिल्हा निबंधक कार्यालयांसमोर "मी कर्जमुक्त होणारच' हे अभियान राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे आंदोलन केले. 

सरसकट कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात 1110 महा ई-सेवा केंद्रे आहेत. यापैकी 950 कार्यरत आहेत. पण शासनाने या योजनेतील लाभार्थ्यांची जाहीर केलेली संख्या फसवी आहे. या बाबतचे सत्य जनतेसमोर यावे यासाठी हे आंदोलन करत असून यापुढे आपल्या कार्यालयाकडून हे आकडे जाहीर झाले नाहीत तर शिवसेना ते जाहीर करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

या आंदोलनात मधुकर पाटील, साताप्पा भवान, महादेव गौड, बाजीराव पाटील, रवी चौगुले, विराज पाटील, अवधूत साळोखे, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, शशिकांत बिडकर, दिलीप देसाई आदी सहभागी झाले होते.

Web Title: kolhapur news shiv sena loan