शिवाजी बँक घोटाळा प्रकरणी संचालकांवर जबाबदारी निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापूर - गडहिंग्लजच्या शिवाजी सहकारी बॅंकेच्या आर्थिक नुकसानप्रकरणी ४६ जणांवर ४ कोटी २८ लाखांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. याबाबतचा अहवाल प्राधिकृत अधिकारी सुनील धायगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना सादर केला. नुकसानीस जबाबदारांमध्ये संचालक प्रकाश चव्हाण, किसन कुऱ्हाडे या नेत्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर - गडहिंग्लजच्या शिवाजी सहकारी बॅंकेच्या आर्थिक नुकसानप्रकरणी ४६ जणांवर ४ कोटी २८ लाखांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. याबाबतचा अहवाल प्राधिकृत अधिकारी सुनील धायगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना सादर केला. नुकसानीस जबाबदारांमध्ये संचालक प्रकाश चव्हाण, किसन कुऱ्हाडे या नेत्यांचा समावेश आहे.

गडहिंग्लज सहकारी बॅंकेचे १९९८ ते २०१० या कालावधीतील लेखापरीक्षण तत्कालीन विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षक) डी. ए. चौगुले यांनी केले होते. चौगुले यांनी अपहाराबाबत गुन्हाही नोंद केला आहे. चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सुनील धायगुडे यांना प्राधिकृत केले होते.

अधिकारी, कर्मचारी असे
कृष्णराव कांबळे ९ लाख ६१ हजार ८५३, आबासो देसाई १३ लाख ७२ हजार १०३), एस. एस. मोकाशी ७ लाख ३९ हजार ३५३, टी. जी. पाटील ६ लाख ३१ हजार ८५३, एस. एम. पाटील ६ लाख ३१ हजार ८५३, संजय कणेकर ५ लाख ६० हजार ५३, अरुण देसाई ७ लाख ५९ हजार ३१, सुधाकर देसाई २ लाख, सुधीर देसाई ३८ लाख ८४ हजार ७१५, मधुकर देसाई २५ लाख ६६ हजार ४१२.

नुकसानीची जबाबदारी निश्‍चित केलेले संचालक व रक्कम
तानाजीराव मोहिते १६ लाख २२ हजार ६९०, प्रकाश चव्हाण १६ लाख २२ हजार ६९०, किसन कुऱ्हाडे १६ लाख २२ हजार ६९१, किरण कदम १६ लाख २२ हजार ६८९, प्रमोद रणनवरे १६ लाख २२ हजार ६८७, चंद्रकांत कांबळे १६ लाख २२ हजार ६८६, संजय मोकाशी १६ लाख २६ हजार १८७, विष्णुपंत शिंदे १६ लाख २२ हजार ६८५, विजयसिंह नलावडे ९ लाख ८१ हजार २९७, श्रीमती विजयमाला रणनवरे १६ लाख २२ हजार ६८४, उदय कदम २ लाख ७१ हजार ६४३, संग्रामसिंह घाटगे २ लाख ७१ हजार ६४२, निशिकांत चोथे १ लाख ६हजार ६४३, दीपकराव जाधव २ लाख ७१ हजार ६४३, दत्ताजीराव देसाई २ लाख ७१ हजार ६४३, श्रीमती नंदप्रभा चव्हाण २ लाख ७१ हजार ६४३, भीमराव पट्टणकुडी २ लाख ११ हजार ६४४, जोतिराम केसरकर २ लाख ७१ हजार ६४४, श्रीकांत पाटील २ लाख ७१ हजार ६४३, (कै.) गोविंद देसाई ३ वारस १३ लाख ४३ हजार ५०२, (कै.) बाजीराव देसाई ३ वारस १३ लाख ५२ हजार ०१२, (कै.) दत्ताजीराव नलावडे २ वारस ६ लाख ११ हजार ८५३, प्रेमिला खोत १३ लाख ५२ हजार ०१२, दिलीप माने १३ लाख ५२ हजार ०१२), (कै.) बाळासो चव्हाण १ वारस १३ लाख ५२ हजार ०१२, मानाजी पाटील १३ लाख ५२ हजार ०१२, भारत पाटील १ लाख ३२ हजार ०९०, गुरुनाथ पाथरवट १३ लाख ५२ हजार ९३, सदानंद दिंडे १३ लाख १३हजार १९३.

Web Title: Kolhapur News Shivaji Bank scam