'संशोधकांनी सत्याची कास धरावी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - सामाजिक शास्त्रातील संशोधकांनी नेहमी सत्याची कास धरली पाहिजे,असे मत इंडियन सोशॉलॉजिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आनंदकुमार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात यु. जी. सी. सॅप डिआरएस फेज - तीन अंतर्गत समाजशास्त्र विभाग आणि सुरत येथील सेंटर फॉर सोशल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवशीय ''सामाजिक शास्त्रातील संशोधन पध्द्‌ती'' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. 

डॉ. आनंदकुमार म्हणाले, "सामाजिक संशोधन हे आव्हानात्मक असते.त्यामुळे संशोधकांनी अत्यंत काळजीपूर्वक संशोधन करावे. समाजाची पुढील वाटचाल ही सामाजिक संशोधनावर आधारित असल्याने संशोधकांनी नेहमी जिज्ञासू वृत्तीने राहायला हवे. त्यातून संवाद तयार होऊन ज्ञानाचा विस्तार होण्यास मदत होते.सद्यकालीन काळात सर्वच विषय हे परस्परावलंबी असून ती काळाची गरज बनलेली आहे. गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी संशोधकाने विषयाशी तादात्म्य व्हावे लागेल." 

प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, "सामाजिक शास्त्रातील संशोधकांनी केलेले संशोधन समाजाला कसे उपयोगी पडेल यांचा विचार संशोधकांनी प्रथम करावा. समाजाची उन्नती ही नवनवीन शोधामुळे होण्यास मोठया प्रमाणावर मदत होते.सद्यकालीन युगात संशोधकांनी पारंपरिक पध्द्‌तीने संशोधन न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन घेवून संशोधन करावे." 

समाजशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख, प्रा. डॉ. जगन कराडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. यावेळी विभागाचे माजी विभागप्रमुख, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. पी. एम. माने उपस्थित होते.

Web Title: kolhapur news shivaji university

टॅग्स