शाश्वत विकासासाठी समाजात योगदान द्या - डॉ. ए. एस. किरणकुमार

संदीप खांडेकर
सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - ज्ञान व कौशल्य संपादित करत शाश्वत विकासासाठी समाजात योगदान द्या, असे आवाहन इस्त्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. ए. एस. किरणकुमार यांनी येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त सोह्ळ्यात ते बोलत होते. लोककला केंद्रात कार्यक्रम झाला. विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामधील एम. ए.ची विद्यार्थिनी प्रियांका राजाराम पाटील हिला राष्ट्रपती पदक तर सातारामधील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा विजय मोरे हिला कुलपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. किरणकुमार म्हणाले, " टीम स्पिरीट हा यशाचा सर्वोच्च शिखर गाठण्यासाठीचा महत्त्वाचा मार्गदर्शक आहे. जे ज्ञान व कौशल्य तुम्ही संपादित केले आहे त्याच्या जोरावर तुमच्याकडे करियरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत."

प्र-कुलगुरू डॉ. डी.टी शिर्के म्हणाले... 

  • येत्या शैक्षणिक वर्षापासून चाॅईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सर्व पदवी अभ्यासक्रमानुसार लागू होणार 
  • काॅम्प्युटर सायन्स व आय. टी. शाखांमधील २४ विषयांची परीक्षा आॅनलाइन 
  • सीबीसीएस अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ओपन इलेक्टिव्ह कोर्सेसचे मॅन्यूअल विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध 

ढोल ताशाच्या ठेक्यात वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगत काढण्यात आलेली ग्रंथदिंडी आज लक्षवेधी ठरली. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळयानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. 

कमला महाविद्यालयापासून ग्रंथदिडीस सुरवात झाली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. ग्रंथ आमचा गुरु, ग्रंथ आमचा सखा, वाचाल तर टिकाल, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करु या आशयाचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. ढोल ताशाच्या ठेक्यात राजारामपुरी, माऊली चौक, सायबर चौक ते विद्यापीठ असा दिंडीचा मार्ग राहिला. 

प्र-कुलगुरू डॉ. डी.टी शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा.डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.डॉ.डी.के.गायकवाड, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. अण्णासाहेब गुरव दिंडीत सहभागी झाले होते. कमला, शहाजी, डी. डी. शिंदे, शाहू, विवेकानंद, महावीर  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचाही सहभाग होता. 

Web Title: Kolhapur News Shivaji University Convocation program