शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत 146 जागांसाठी 251 जण रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत शनिवारी (ता. 4) माघारीच्या दिवशी विविध गटांतील ६७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता १४६ जागांसाठी २५१ उमेदवार रिंगणात राहिले.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत शनिवारी (ता. 4) माघारीच्या दिवशी विविध गटांतील ६७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता १४६ जागांसाठी २५१ उमेदवार रिंगणात राहिले.

अर्ज माघारीनंतर प्राचार्य गटातील दहा जागा व संस्था प्रतिनिधी गटांतील पाच जागांसह अधिसभेच्या १७ जगांवर आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचा दावा शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे भय्या माने व प्राचार्य डी. आर. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. 

दरम्यान, काही जागांच्या अपिलावर उद्या (ता. ५) सुनावणी होणार असून, त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. आज विविध गटांतील उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी सुरवात केली होती. माघारीनंतर काही गटांत प्रतिस्पर्धीच न उरल्याने त्या जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा अंदाज घेऊन काही उमेदवार आणि पॅनलप्रमुखांनी बिनविरोध झाल्याचा दावा केला आहे. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत सुटा पुरस्कृत पंधरा, तर अधिकार मंडळातील एक अशा १६ जागा बिनविरोध निवडून आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, उद्या (ता. ५) अर्जावरील अपिलावर निर्णय होईल. यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे पदवीधर गटात पाच आणि सहकारी संघटनांचे चार असे एकूण नऊ जागांवर स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहेत.

बिनविरोधचा आज फैसला
प्राचार्य गटातून प्रवीण चौगले (कागल), सुरेश गवळी (केएमसी), एल. जी. जाधव (सातारा), डी. जी. कणसे (सांगली), मोहन राजमाने (कराड), महिला गट- भाग्यश्री जाधव, एससी प्रवर्गातून एस. आर. बामणे, ओबीसी प्रवर्गातून आर. आर. कुंभार आदी आठ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्‍यता वर्तविली आहे. दोन गटांतील निर्णय अपिलात होईल. त्यानंतरच्या निर्णयावर अधिकृत घोषणा होणार आहे.

संस्था प्रतिनिधी गट
भय्या माने, शुभांगी गावडे, धैर्यशील पाटील, प्रताप पाटील, सतीश घाळी आदी उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्‍यता आहे. एका जागेवर उद्या (ता. ५) अपिलावर निर्णय आहे. त्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होईल.

Web Title: Kolhapur News Shivaji University Election