कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत १५ अभ्यास मंडळांवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) २१ उमेदवार विजयी झाले. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांनी २० जागांवर बाजी मारली; तर ४ अपक्ष उमेदवार विजयी झाले. १५ पैकी ७ मंडळांवर विकास आघाडी, तर ६ मंडळांवर ‘सुटा’चे वर्चस्व राहिले आहे. एका गटात अपक्ष व अन्य एका गटात समसमान उमेदवार निवडून आले. यापूर्वी ११ अभ्यास मंडळे बिनविरोध झाली आहेत. त्यांतील १० जागांवर विकास आघाडीचे वर्चस्व आहे. विकास आघाडीचे एकूण १७ व ‘सुटा’चे ६ अभ्यास मंडळांवर वर्चस्व आहे. विद्यापीठातील परीक्षा भवनात आज मतमोजणी झाली.
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे सदस्य सकाळी साडेआठलाच
परीक्षा भवन एकच्या परिसरात हजर होते. निकालाची हुरहूर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सकाळी नऊला मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर प्रथम विद्यापीठ शिक्षक गटाचा निकाल जाहीर झाला. या गटात शिवाजी विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ पीजी टीचर्स असोसिएशनचे (सुप्टा) सचिव प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड तब्बल १०० मते मिळवून विजयी झाले. खुल्या प्रवर्गातून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या प्रा. डॉ. भारती पाटील ९७, तर याच आघाडीचे प्रा. सागर डेळेकर ९५ मते मिळवून विजयी झाले. प्राचार्य गटाच्या दहापैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. सी. टी. कारंडे ८९ मते मिळवून विजयी झाले. निवडणुकीत प्राचार्यांची पाच मते बाद झाली.
* यापूर्वी बिनविरोध झालेली अभ्यास मंडळे
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी - राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अकाउंटन्सी, स्टॅट, शिक्षणशास्त्र, फार्मसी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इक्लेट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सायकॉलॉजी.
ते दोघे पराभूत
भूगोल अभ्यास मंडळासाठी ‘सुटा’चे अरुण ए. पाटील व शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे अरुण बी. पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दोघेही पराभूत झाले.
चिठ्ठीवर हासबे विजयी
गणित अभ्यास मंडळासाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे दिलीप रायाप्पा हासबे व ‘सुटा’चे जनार्दन ज्ञानदेव यादव यांना समान पाच मते पडली. चिठ्ठीवर दिलीप हासबे विजयी झाले.
तीनही जागा ‘सुटा’कडे
इतिहास मंडळाच्या तिन्ही जागांवर ‘सुटा’चे उमेदवार विजयी झाले. एन. ए. वरेकर, एम. ए. चव्हाण, राजश्री निकम यांचा समावेश आहे.
विकास मंचाला स्थान
पाच संघटनांच्या एकत्रीकरणातून आकारास आलेल्या शिवाजी विद्यापीठ विकास मंचचे सदस्य व शिवाजी विद्यापीठ पीजी टीचर्स असोसिएशनचे डॉ. एन. बी. गायकवाड तब्बल शंभर मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विजयाने विकास मंचने विद्यापीठ शिक्षक गटात स्थान मिळवले.
‘सुटा’चे सहकार्यवाह पराभूत..
‘सुटा’चे सहकार्यवाह डॉ. आर. जी. कोरबू बिझनेस इकॉनॉमी अभ्यास मंडळाचे उमेदवार होते. त्यांना केवळ दोनच मते मिळाल्याने ते पराभूत झाले.
फेरमतमोजणीत सोनाप्पांची बाजी...
कॉमर्स अभ्यास मंडळावर तुळशीराम महानवर हे विजयी झाले. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार सोनाप्पा दाजीबा गोरल यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यात सोनाप्पा यांनी दहा मते मिळवून बाजी मारली.
भारती पाटील विजयी
विद्यापीठ शिक्षक गटाच्या खुल्या प्रवर्गातून प्रा. डॉ. भारती पाटील विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा आनंद गुलाल उधळून साजरा करण्यात आला.
* अभ्यास मंडळांचे निकाल असे :
* विषय मते गट
* गणित
- हंबीरराव तात्यासाहेब शिंदे ५ सुटा
- दिलीप रायाप्पा हासबे ३ विकास आघाडी
- नवनीत धोंडिबा सांगळे ५ विकास आघाडी (चिठ्ठीवर विजयी)
* व्यवस्थापन
- दत्तात्रय तात्याबा चवरे ५ विकास आघाडी
- शंकर भोला सारंग ५ विकास आघाडी
- रवींद्र बसवंत तेली ७ सुटा
* भौतिकशास्त्र
- एम. एम. कारंजकर ९ विकास आघाडी
- व्ही. व्ही. किल्लेदार ११ विकास आघाडी
- उत्तम किसन मोहिते ८ सुटा
* वनस्पतिशास्त्र
- वनिता चंद्रशेखर कारंडे ९ विकास आघाडी
- महेंद्र बसाप्पा वाघमारे ९ विकास आघाडी
- अशोक नानासाहेब सादळे ७ सुटा
* बिझनेस इकॉनॉमिक्स
- विजय मारुती कुंभार ७ विकास आघाडी
- उल्हास महादेव माळकर १४ सुटा
- बाळासाहेब धोंडिबा माने ९ सुटा
* मराठी
- अरुण कृष्णा शिंदे २४ सुटा
- उदय रामचंद्र जाधव १९ सुटा
- दत्तात्रय मल्लू पाटील २२ अपक्ष
* मायक्रोबॉयोलॉजी
- हणमंत विठ्ठल देशमुख ३ विकास आघाडी
- ए. आर. जाधव ३ सुटा
- शिरीषकुमार सुपनेकर ३ सुटा
* कॉमर्स
- सोनाप्पा दाजीबा गोरल १० विकास आघाडी
- शिवाजी रामचंद्र पोवार १३ सुटा
- उदयकुमार रामचंद्र शिंदे १४ सुटा
* इंग्रजी
- एस. बी. भांबर २८ विकास आघाडी
- एन. पी. खवरे २५ विकास आघाडी
- आर. एस. पोंडे २० सुटा
* भूगोल
- श्रीकृष्ण गायकवाड १२ अपक्ष
- बाळासाहेब जाधव १३ विकास आघाडी
- विनोद वीर १२ अपक्ष
* इतिहास
- एन. वरेकर ३५ सुटा
- एम. ए. चव्हाण २३ सुटा
-राजश्री निकम १८ सुटा
* हिंदी
- एस. बी. बनसोडे अपक्ष
- संजय चिंदगे १९ सुटा
- एकनाथ पाटील १९ विकास आघाडी
* प्राणिशास्त्र
- विश्वनाथ यशवंत देशपांडे ६ विकास आघाडी
- सुरेश खाबडे ९ विकास आघाडी
- सत्यवान पाटील ६ सुटा
* अर्थशास्त्र
- व्ही. बी. देसाई २५ सुटा
- विजयकुमार पाटील २२ सुटा
- एस. एम. भोसले २५ विकास आघाडी
* रसायनशास्त्र
- आर. एम. कांबळे १३ सुटा
- सी. पी. माने १७ विकास आघाडी
- संजय पोरे १४ विकास आघाडी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.