हिंदीतील करियरचा मार्ग झाला सूकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

कोल्हापूर - कोण म्हणते हिंदी भाषेत करियर करता येत नाही? केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही हिंदी भाषेतील करियरच्या संधी असून, शिवाजी विद्यापीठात कौशल्य आधारित तंत्रज्ञानाशी संबंधित एम. ए. भाषा प्रौद्योगिकी, संगणक व भारतीय भाषा अनुप्रयोग पदविका अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. हिंदी विभागाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 54 लाख अनुदानातून अभ्यासक्रम सुरू झाले असून, हिंदीतील करियरचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी सूकर झाला आहे. 

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एम. ए. भाषा प्रौद्योगिकी अभ्यासक्रम सुरू आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे विद्यापीठ देशासह राज्यातील दुसरे आहे. अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून, त्यासाठी विद्यार्थी क्षमता पंधरा इतकी आहे. भारतीय भाषा अनुप्रयोग पदविका अभ्यासक्रम एम. ए. हिंदी अभ्यासक्रम करताना पूर्ण करता येतो. हिंदी भाषेतील शिक्षणाने बॅंका, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, संसद, विधानसभा, दवाखाने, रेल्वे, एअरलाइन्स, पर्यटन, राजदुतावाद, उच्चायुक्त कार्यालयात नोकरीच्या संधी आहेत. मात्र, त्यासाठी एम. ए. हिंदी, हिंदी अनुवाद पदविका, एम. ए. भाषा प्रौद्योगिकी, संगणक व भारतीय भाषा अनुप्रयोग पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी सांगितले. 

151 देशांत हिंदी भाषेचे अध्ययन व संशोधन 
- फिजी, सुरीनाम, गियना, मॉरिशस, त्रिनिदाद अँड टोबगो, नेपाळमध्ये अधिक प्रमाणात हिंदी बोलली जाते. 
- सुमारे 151 देशात हिंदी भाषा व साहित्याचे अध्यापन, अध्ययन व संशोधन होते. 
- अमेरिकेतील दोनशे संस्था व विद्यापीठे, इटली पाच, पोलंड दोन विद्यापीठे, कोरिया, जपान, चीन, इस्त्रायलमधील विद्यापीठे, आफ्रिका, इंग्लंड, नेदरलॅंड, नॉर्वे, फ्रान्समध्ये पाचवीपासून हिंदी भाषा व साहित्याच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनाचे विशेष प्रयत्न होतात. 
- अमेरिकेतील मिलिटरी स्कूल्समध्ये अनेक हिंदी शिक्षकांची आवश्‍यक आहे. 
- अमेरिकेत बिझनेस हिंदी नावाची अमेरिकन सरकारची योजना चाळीस वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. 

व्यवसाय व रोजगाराच्या संधी अशा 
- वरिष्ठ, कनिष्ठ अनुवादक 
- तत्काल भाषांतरकर्ता, दुभाषी 
- हिंदी अधिकारी 
- अध्यापक, प्राध्यापक, प्रशिक्षक 
- भाषा निदेशक, उपनिदेशक, सहायक निदेशक 
- राजभाषा अधिकारी, समाचार वाचक, संवाददाता 
- संपादक, सहसंपादक, उपसंपादक, सहायक संपादक 
- विज्ञापन लेखक, संवाद लेखक, पटकथा लेखक 
- संगणक अनुवादक, भाषा विश्‍लेषक, शब्द संयोजक, डाटा विश्‍लेषक 

Web Title: kolhapur news shivaji university hindi

टॅग्स