शिवसेनेचा कोल्हापूरात इंधन दरवाढी विरोधात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर - पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सामान्य माणसाला भाजप सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. असे हे सरकार 2019 च्या निवडणुकीत उलथवून टाका, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले. इंधन दरवाढीच्या विरोधात शहर शिवसेनेने बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कोल्हापूर - पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सामान्य माणसाला भाजप सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. असे हे सरकार 2019 च्या निवडणुकीत उलथवून टाका, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले. इंधन दरवाढीच्या विरोधात शहर शिवसेनेने बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी क्षीरसागर बोलत होते. 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अच्छे दिन' येतील असे म्हंटले होते. असे दिन खरंच आपल्या वाट्याला आले का? पंधरा लाख रूपये तुमच्या खात्यात जमा झाले का? केंद्र सरकार गाजर एकीकडे गाजर दाखवते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुसऱ्या बाजूला लॉलीपॉप दाखवतात? पहिले चोर गेले आणि दूसरे चोर सत्तेवर आले असे म्हटले तर वावगे ठरू नये अशी आजची स्थिती आहे.

इंधनवाढीवर बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की पाच वर्षापूर्वी कच्या तेलाची किंमत बॅंरेल मागे 100 रूपये होती. त्यावेळी 60 ते 65 रूपयात पेट्रोल मिळत होते. डिसेंबरमध्ये कच्या तेलाची किंमत लीटरमागे 25 रूपये 28 पैशांनी कमी झाली असतानाही पेट्रोलचा लीटरमागे दर ऐंशी रूपयांवर पोहचला. दरवाढ कायम राहिली तर शंभर रूपयांपर्यंत दर जाण्यास वेळ लागणार नाही. राज्य शासनाने पेट्रोलवर नऊ रूपये अधिभार आणि 25 टक्के व्हॅट आकारते. पेट्रोलवर लावलेले कर यास कारणीभूत आहे. शिवसेना सत्तेत असताना पाच वर्षे जीवनावश्‍यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले. 

मोर्चास शिवाजी चौक येथून सुरवात झाली. प्रमूख मार्गावरून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. `सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय`, `इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो` अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. अन्य एका बैलगाडीवर स्कूटरही प्रतिकात्मक ठेऊन निषेध करण्यात आला. 

माजी नगरसेवक सुनील मोदी, अरूण सावंत, पद्माकर कापसे यांचीही भाषणे झाली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर दिले. नगरसेवक नियाज खान, राहूल चव्हाण, प्रज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, रविकिरण इंगवले, दिंगबर फराकटे, ऋतुराज क्षीरसागर, दिपक गौड, किशोर घाटगे, मंगल कुलकर्णी, मंगल साळोखे, पूजा भोर, राजू हुंबे, गीता भंडारी, रघुनाथ टिपुगडे, जयवंत हारूगले, सुनील भोसले, मीना पोतदार, पियूश चव्हाण, योगेश चौगले, तुकाराम साळोखे. प्रकाश सरनाईक आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

 

Web Title: Kolhapur News Shivsena agitation against petrol rate hike