पेट्रोल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हातकणंगलेत शिवसेनेचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

हातकणंगले - केंद्र सरकारने तीन वर्षात तब्बल पंधरावेळा इंधन दरवाढ केली आहे. यामध्ये पेट्रोल 10 रुपयांनी वाढ, डिझेल सहा रुपयांनी वाढ, तर घरगुती गॅस 35 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ थांबवून सरकारने जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी आज हातकणंगले तहसील कार्यालयावर शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध झाला. हातकणंगलेचा तहासिलदार वैशाली राजमाने यांच्याकडे निवेदन दिले. 

आज दुपारी 12 ला हातात भगवे ध्वज घेऊन केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ रद्द करावी, अशा घोषणा देत शिवसैनिकानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या निवेदनात केंद्र सरकारने नोटाबंदी, जीएसटी यासारखे निर्णय घेऊन जनतेला नाहक त्रास देण्याचे काम केले आहे. यातून जनता सावरत असताना इंधन दरवाढ करुन सर्व सामान्य जनतेचा आर्थिक बजेटलाच सुरूंग लावला आहे. सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. तरी केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही केली आहे. अन्यथा तीव्र अंदोलन करणार असल्याचे ही यामध्ये नमूद केले आहे. 

आज काढलेल्या मोर्चात आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, बाबासो शिंगे, अनिल सुतार, संदीप दबडे, महेश चव्हाण, पिंटू मुरूमकर, उषाताई चौगुले, सरदार सुर्यवंशी, बाजीराव पाटील, बबलू खाटीक, साताप्पा भवाण, धोंडीराम कोरवी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Shivsena agitation aginst petrol hike