शिवसेना आमदारांचे भाजप प्रेम 

सदानंद पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - संधी मिळेल तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पक्षावर शेलक्‍या शब्दात टीका करणारे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज चक्‍क मंत्री पाटील यांचेसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे  गोडवे गायीले.

कोल्हापूर - संधी मिळेल तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पक्षावर शेलक्‍या शब्दात टीका करणारे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज चक्‍क मंत्री पाटील यांचेसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे  गोडवे गायीले.

दादांच्या भक्‍कम नेतृत्वापासून ते सरकारचा अभिमान वाटत असल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. आमदार क्षीरसागर यांच्या वक्‍तव्याने भाजपचे कार्यकर्तेही यावेळी चकीत झाले. आमदार क्षीरसागर यांच्यात एवढे 'परिवर्तन' होण्याचे कारण काय, याचा शोध मात्र भाषणानंतर सुरु झाला. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व कोल्हापूर उत्तरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात मोठी कटुता आहे. मंत्री पाटील यांनी घेतलेल्या निर्णयांना आमदार क्षीरसागर यांनी उघड-उघड विरोध केला. गतवेळच्या गणेशोत्सवात या दोघातील दरी अधिकच वाढली. मंत्री पाटील यांनी डॉल्बीला बंदी केली. तर आमदार क्षीरसागर यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत मंडळांना पाठिंबा दर्शवला.

या दोघांमधील संघर्षाची झलक सोशल मिडीयात दिसून आली. अगदी अलिकडेच त्यांनी पालकमंत्र्यांच्या सीएसआर निधीची चौकशी लावण्याची भीम गर्जनाही केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी अचानकच घेतलेल्या यू टर्नने चर्चेला उधाण आले आहे. 

भाजप-शिवसेना युती करण्यासाठी मंत्री पाटील यांनी आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे आमदार क्षीरसागर यांच्या मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी मंत्री पाटील यांनी फिल्डींग लावली आहे. या मतदार संघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून अर्धा डझन उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. तसेच कदाचित पालकमंत्रीच या मतदार संघातून स्वत: निवडणूक लढवतील अशी खात्री भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरु आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी उधळलेल्या स्तुतीसुमनांचा अर्थ काय, याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे. 

Web Title: Kolhapur News Shivsena MLA Rajesh Kshirsagar loves BJP