लग्न, सहलींसाठी आता ‘शिवशाही’ प्रवास...

शिवाजी यादव
रविवार, 20 मे 2018

कोल्हापूर - दीर्घ पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी उपयुक्त ठरलेली शिवशाही गाडी आता लग्नकार्य व कौटुंबिक सहलीसाठी मिळू लागली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास ६० हून अधिक गाड्या अशा खासगी प्रवासासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या महसूल वाढीस हातभार लागत आहे; तर प्रवाशांनाही कमी दरात आलिशान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. 

लग्नासाठी वऱ्हाड एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटी गाड्यांना अनेकजण प्राधान्य देतात. 

यातील साध्या गाडीसाठी ४८ रुपये प्रति किलोमीटर या भाड्यात एसटीची साधी गाडी मिळते. मात्र कोल्हापूर-पुणे यापेक्षा जास्त अंतराचा प्रवास असेल तर साध्या गाडीत प्रवासी अवघडून जातात. त्यामुळे अनेकजण प्रवास आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही गाडीची मागणी करीत आहेत.

अशात एसटी महामंडळाने कमी दरात म्हणजेच ५४ रुपये प्रति किलोमीटर या भाड्यात शिवशाही गाड्या उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे साध्या गाडीच्या तुलनेत सहा रुपये फक्त जास्त मोजावे लागतात तर साधी किंवा शिवशाही घेतल्यास दोन्ही गाड्यांना जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे साध्या गाडीच्या तुलनेत शिवशाही गाडीच परवडत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.  

शिवशाही गाडीचा प्रवास सध्या कोल्हापूर - मुंबई, पुणे, चंदगड - मुंबई, कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गावर होत आहे यात कोल्हापूर-पुणे मार्गावर शिवशाहीला सर्वाधिक प्रतिसाद आहे. बहुतांशी आयआयटीयन्स या गाडीने प्रवास करतात. यात ग्रामीण भागातील युवकांचा  मोठा समावेश आहे. यातील अनेकजण आपल्या कौटुंबिक सहली, इंडस्ट्रीयल सहली किंवा लग्नकार्यासाठी शिवशाहीची मागणी करीत आहेत. 

शिवशाही गाडी लग्नासाठी किंवा अन्य कोणत्याही अधिकृत सहलीसाठी देण्यात येतात. त्याला चांगला प्रतिसाद आहे. आरामदायी आसन व्यवस्था व ४४ प्रवासी संख्येची ही गाडी किफायतशीर ठरते. त्यामुळे दूर अंतराचा प्रवास आरामदायी होतो. प्रवाशांनी पूर्व नोंदणी करून या गाड्या घेता येतील. 
- अतुल मोरे,
एसटी वाहतूक विभाग

Web Title: Kolhapur News Shivshahi for marriage festival and tour