महामंडळाचे मौन, शिवशाही बनली टीकेचे लक्ष्य

शिवाजी यादव
मंगळवार, 29 मे 2018

कोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासाची शिवशाही बससेवा म्हणजे एसटी महामंडळाचे खासगीकरण अशी टीका संघटनात्मक पातळीवर सुरू आहे. त्यासाठी शिवशाहीच्या उणिवा व खासगीकरणाच्या चर्चेला संघटना सभासदांकडून बळ दिले जात आहे. अशात एसटी महामंडळाने मौन पाळल्याने शिवशाही सेवा टीकेचे लक्ष्य बनली आहे. परिणामी अशी टीका खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडत आहे. याचा एसटीला आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे. 

दहा वर्षांत राज्यात खासगी वाहतूक वाढली. मुंबईतील ‘बड्या’ गुंतवणूकदारांनी आलिशान गाड्या खासगी प्रवासी वाहतुकीला लावल्या. हंगामात तिकीट वाढवून व बिगर हंगामात तिकीट दर पाडून प्रवासी वाहतुकीत स्पर्धा लावली. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटीची लाल परी, परिवर्तन व निमआराम बस ठरलेल्या वेळेतच सुटतात. कधी कधी सुमार कॅन्टीनवर 
चहा-नाश्‍ताला थांबतात. खासगीच्या तुलनेत त्यांचे पाच-पंचवीस रुपये जादा भाडे होते. या प्रकारामुळे एसटीचा २५ ते ३५ टक्के प्रवासी वर्ग खासगी बसकडे वळला. तिथे त्याला सेमी स्लीपरमधून आरामदायी आलिशान प्रवास घडतो.

थोडी तिकीट वाढ सोसावी लागली, तरी सुखद प्रवास म्हणून एसटीचा प्रवासी वर्ग खासगीकडे वळला. परिणामी, एसटीचा दीर्घ पल्ल्याचा प्रवासी कमी झाला. कोल्हापुरातून रात्री दहानंतर मुंबई - ठाणे, नाशिक मार्गावर एसटीला प्रवासी नसल्याने एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या. याच वेळी प्रवासी रात्री दहानंतर खासगी आरामबसकडे जातात, असे चित्र नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, पणजी येथून कोल्हापुरात येणाऱ्या गाड्यांचे आहे. 

स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही गाड्या सेवेत आणल्या. खासगी आरामबसच्या तुलनेत शिवशाहीचे काही मार्गावर भाडे कमी, आरामदायी प्रवास, वायफाय सुविधामुळे प्रवासी प्रतिसाद लाभला. यात कोल्हापुरात सर्वाधिक प्रवासी असूनही शिवशाही म्हणजे खासगीकरण अशी चर्चा होते. यावर एसटीने मात्र काहीच भाष्य केलेले नाही. एवढच नव्हे तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या शिवशाही गाड्याही वाढविल्या नाहीत.

‘शिवशाही’ची सेवा असावी, याविषयी दुमत नाही. खासगी कंपनीकडून १५०० गाड्या घेतल्या, त्यातील बहुतांशी रक्कम खासगी कंपनीला जाते. येथे एस.टी.ला तोटा होतो. तो आम्हाला मान्य नाही. त्याऐवजी एस.टी.ने स्वत:च्या गाड्या घ्याव्यात.
- एक कर्मचारी, एस.टी.

Web Title: Kolhapur News Shivshahi v/s Lalpari ST Bus