पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्तीदलाचे आंदोलन

डॅनियल काळे
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - चांदोली धरण प्रकल्पातील 72 धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. पण एप्रिलमध्ये त्यांच्या जमिनी पुन्हा काढून घेण्यात आल्या. या जमिनी पुन्हा मिळाव्यात, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. कागल तालुक्यातील निवळे (गलगले) येथे चांदोली धरणग्रस्तांतील  72 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. 2006 पर्यंत हे प्रकल्पग्रस्त ही जमीन कसत होते. मात्र 4 एप्रिल 2018 ला या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. ही जमीन परत मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पुनर्वसनासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासोबत भारत पाटणकर व प्रकल्पग्रस्तांनी चर्चा केली. 

Web Title: Kolhapur News Shramik Mukti Dal agitation