श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त सुवर्ण रथ प्रदान

संजय खूळ 
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

श्रवणबेळगोळ - येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आज भव्य सुवर्ण रथ प्रदान करण्यात आला. विंध्यगिरी पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमात आचार्य श्री पुष्पदंत सागर महाराज आणि जगदगुरु चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध वाध्याच्या गजरात हा रथ समर्पित करण्यात आला.

एक हजार वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या या ठिकाणी मराठी भाषेतील पहिले अक्षर सापडल्याची नोंद आहे. तसेच भगवान बाहुबली मूर्ती स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होतात. यंदा आयोजित कार्यक्रमामध्ये  भव्य शोभा यात्रा हे आकर्षण असून संपूर्ण विंध्यगिरी पर्वताला वेढा घालणारी भव्य मिरवणूक लक्षवेधी आहे. या शोभा यात्रेत सर्वाधिक आकर्षण सोनेरी रथाचे आहे. हा रथ नातीदेवी ठोलीया जैन ( चेन्नई ) परिवार कडून देण्यात आला आहे. हा रथ समर्पित करण्याचा अत्यंत भावपूर्ण सोहळा सकाळी विंध्यगिरी पहाडाच्या पायथ्याला झाला. 

हा रथ देशाला गौरव ठरणारा असा आहे. भारतीय संस्कृतीत रथाला अनन्य महत्व असून या पुढे हजारो वर्ष या रथाची गाथा आठवणीत राहील.

- चारुकीर्ती भटारक महाराज

 आचार्य श्री पुष्पदंतसागर महाराज यांनी विधीवतपणे या रथामध्ये भगवान बाहुबलीची मूर्ती ठेवली. त्यानंतर संपूर्ण  ठोलीया परिवारांना या रथामध्ये बसण्याचा मान देण्यात आला. यावेळी  कमलकुमार जैन यांना श्रावकरत्न पुरस्काराने  तर रथ तयार करणारे तामिळनाडू चे रवींद्रम यांना स्थापितरत्न पुरस्काराने महोत्सव समितीचे अध्यक्ष सरिता जैन आणि चारुकुर्ती भटारक महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी वाद्यांच्या गजरात हा रथ समर्पित करण्यात आला. 

Web Title: Kolhapur News Shravanabelagola Mahamastakabhisheka Special