निरोगी मन हीच निरोगी शरीराची गुरुकिल्ली - प्राचार्य श्रीधर हेरवाडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

कोल्हापूर - निरोगी मन हीच निरोगी शरीराची गुरुकिल्ली असते. ज्येष्ठांनी आपल्या उतरत्या वयात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सुखी जीवन जगावे, असे आवाहन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी केले.

कोल्हापूर - निरोगी मन हीच निरोगी शरीराची गुरुकिल्ली असते. ज्येष्ठांनी आपल्या उतरत्या वयात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सुखी जीवन जगावे, असे आवाहन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी केले.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया (जी.एस.आय.) कोल्हापूर शाखा यांच्यावतीने कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिक आरोग्य केंद्र सुरू झाले. याच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

प्राचार्य हेरवाडे म्हणाले, ""आयुष्यातील सेकंड इनिंगमध्ये अल्प आहार, विपूल विहार, विशुद्ध विचार आणि निर्मळ आचार ही निरोगी जीवनाची चतुःसूत्री जोपासली पाहिजे. तामसी आहार टाळून सात्विक आहार घेतल्यास सतप्रवृत्तीची भावना निर्माण होते.'' 

मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे आणि जेरीयाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आनंद कामत यांनी जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया (जी.एस.आय.), कोल्हापूर शाखा व कोल्हापुरातील डॉक्‍टरांची शिखरसंस्था असणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (के.एम.ए) यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल असोसिएशनच्या हाऊसमध्ये हे आरोग्य केंद्र सुरू करीत आहोत. हे आरोग्य केंद्र दर शुक्रवारी 4 ते 6 या वेळेत सुरू राहील, असे सांगितले.

आज या मोफत तपासणीचा 200 हून अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. या वेळी सचिव डॉ. महादेव मिठारी, केएमएचे मानद सचिव डॉ. संदीप साळोखे, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. विद्युत शहा, डॉ. अजित चांदेलकर, डॉ. जयंत वाटवे यांच्यासह कोल्हापुरातील नामवंत डॉक्‍टर्स, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Shridhar Herwade comment