रेंदाळमधून चांदी व्यापाऱ्याचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

हुपरी - व्यवसायातील लाखो रुपयांच्या आर्थिक देवघेवीच्या कारणातून रेंदाळमधून चांदी व्यावसायिक अमोल नेताजी शिंदे (वय ३०, रा. बिरदेवनगर) यांचे मोटारीत घालून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील जत येथील दोन चांदी व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हुपरी - व्यवसायातील लाखो रुपयांच्या आर्थिक देवघेवीच्या कारणातून रेंदाळमधून चांदी व्यावसायिक अमोल नेताजी शिंदे (वय ३०, रा. बिरदेवनगर) यांचे मोटारीत घालून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील जत येथील दोन चांदी व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्यांमध्ये पोपट शामराव जाधव (वय ३७), आबासाहेब शामराव जाधव (३४) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सिद्धनाथ निवृत्ती माने (४५) व महादेव निवृत्ती माने (३२, सर्व रा. जत, जि. सांगली) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी - अमोल शिंदे हे चांदी दागिने फिरतीचा व्यवसाय १५ वर्षांपासून करतात. उधारीवर चांदी माल आणून ते परपेठेवरील व्यापाऱ्यांना विक्री करतात.  ते जतचे व्यापारी जाधव  यांच्याकडून माल आणतात. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना येथील एका व्यापाऱ्याने शिंदे यांची ५८ किलो चांदीची फसवणूक केली. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले. या गुन्ह्याची सतना येथील पोलिस ठाण्यात नोंद आहे. अशा स्थितीत दिलेली चांदी किंवा त्याची रक्कम देण्यासाठी जाधव यांच्याकडून सतत तगादा सुरू होता. रक्कम मिळत नसल्याचे पाहून जाधव यांनी पाच-सहा जणांसह काल (ता. २२) दुपारी एकच्या सुमारास रेंदाळ येथे येऊन शिंदे यांना घरातून उचलून मोटारीत घालून पळवून नेले व जत येथे डांबून ठेवले.

दरम्यान, अमोल यांच्या पत्नी राजश्री यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्याद घ्यावी व घेऊ नये, यासाठी पोलिसांवर दोन्ही बाजूंकडून राजकीय दबाव आणण्यात येत होता. कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी अमोल यांची सुटका केली. मात्र, तत्पूर्वीच गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Kolhapur News Silver trader kidnapped