स्मार्टफोन करणार घराची सुरक्षा

सुयोग घाटगे
बुधवार, 23 मे 2018

कोल्हापूर - वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी काय करावे, सीसीटीव्ही बसावावेत काय? पण हे खिशाला परवडणारे नाही. आता खर्चाचीही चिंता करू नका. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा संरक्षणासाठी वापर करणे एका क्‍लिकवर येऊन ठेपले आहे. तुम्ही जगात कोठूनही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये काय चाललंय हे पाहू शकता, तेही अगदी लाईव्ह.

सीसीटीव्ही हे सुरक्षेसाठी जरी असले तरी त्याहून देखील अधिक सोपे तंत्रज्ञान अगदी आपल्या तळहातावर उपलब्ध आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे २४ तास घरात होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवू शकतो. यासाठी स्मार्टफोनच पुरेसा आहे. उपलब्ध असणाऱ्या ॲप डाऊनलोड करून तुम्हीही हे करू शकता.   

असे वापरू शकता...     
यासाठी सर्वप्रथम दोन स्मार्टफोन आवश्‍यक असून दोन्ही फोनवर हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर वैयक्तिक माहिती भरून लॉग इन करून दोन्ही ॲप्स एकमेकांशी कनेक्‍ट करावे लागेल. हवे त्या ठिकाणी मोबाईल ठेवून इंटरनेटच्या मदतीने लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग सुरू करावे. कोठूनही नेमके काय चालले आहे हे पाहता येते. 

हे आहेत ॲप...
गुगल प्ले स्टोअर येथे  Presence, iCamSpy, Alfred, iCamViewer, CCTV Camera Pros Mobile, Alfred Home Security Camera हे व असे १५० हून अधिक ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. 
Home Security Camera असे सर्च केल्यास इतर उपलब्ध पर्याय दिसतील. होम सिक्‍युरिटी ॲप्स अँड्रॉइड व आयओएस दोन्ही युजरसाठी उपलब्ध आहेत.  

हे महत्त्वाचे...

  •  स्मार्टफोनचा कॅमेरा उत्तम दर्जाचा असल्यास अधिक फायदा होतो 
  •  इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीही चांगली असावी 
  •  चार्जिंग पॉईंट जवळ असावा / चार्जर जोडलेला असावा 
  •  मोबाईल ठेवलेल्या ठिकाणाहून अधिकाधिक दृश्‍य दिसावे याची काळजी घ्यावी 
  •  घरी ठेवलेल्या मोबाईलचे रिंगर आणि व्हायब्रेटर बंद असावेत
  •  स्क्रीन ब्राईटनेस कमी असावा
Web Title: Kolhapur News Smartphone to Home Security