हुपरीवासीयांचा बंद काळात सामजिक सलोखा 

बाळासाहेब कांबळे
गुरुवार, 4 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ राज्यासह कोल्हापुरातही उद्रेक झाला. मात्र स्थानिक बौद्ध समाजाच्या नेत्यांनी आंदोलनासाठी "शिवीमुक्त आचारसंहिता' राबवली आणि तिला लोकांनीही प्रतिसाद दिला. अनुचित प्रकार न घडता कालचे आंदोलन शांततेत झाले. 

हुपरी - हुपरीत बंद, मोर्चा, रास्ता रोको म्हटलं की अंगावर काटा येणारच. कोणत्याही पक्षीय संघटना अथवा समुदायाचे आंदोलन असो, जबरदस्तीचे आवाहन, दगडफेक, अर्वाच्य भाषा, तोडफोड अशा घटनांमुळे सामान्य माणूस तणावाखालीच असायचा. कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ राज्यासह कोल्हापुरातही उद्रेक झाला. मात्र स्थानिक बौद्ध समाजाच्या नेत्यांनी आंदोलनासाठी "शिवीमुक्त आचारसंहिता' राबवली आणि तिला लोकांनीही प्रतिसाद दिला. अनुचित प्रकार न घडता कालचे आंदोलन शांततेत झाले. 

अनेकदा दंगलीमुळे येथील लोक दंगलीमुळे पोळून निघाले आहेत. पोलिस दप्तरी हुपरीच्या नावाखाली लालरेघ आहे. कोठेही, कसलीही घटना घडण्याचा अवकाश हुपरीमध्ये प्रतिक्रिया उमटलीच म्हणून समजा. बंद, मोर्चा, रास्ता रोकोचे नाव घेतले की लोक, व्यापारी, व्यावसायिक यांच्या मनात धस्स व्हायचे. कालच्या कोरेगाव भिमा प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर साहजिकच येथे अस्वस्थ असे वातावरण होते. 

बौद्ध समाज, रिपब्लिकन पक्ष, विविध गट, संघटना, आंबेडकरी अनुयायी यांनी भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, रास्ता रोको, बंदचा निर्णय घेतला. लोक धास्तावले; मात्र प्रमुख नेत्यांनी जबाबदारीचे भान ठेवून आंदोलनास गालबोट न लागण्याची दक्षता घेत आदर्श आचारसंहिता तयार केली. लोकांनीही बंद, मोर्चा, रास्ता रोको, आंदोलन शांततेत केले.

कालचा आठवडी बाजार सुरळीत झाला. साहजिकच व्यापारी, व्यावसायिकांनी सुटकेचा निश्‍वास घेतला. याचे श्रेय माजी सरपंच मंगलराव माळगे, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती किरण कांबळे, धर्मवीर कांबळे, आनंदराव कांबळे, प्रा. विशाल कांबळे, प्रा. किरण भोसले, नगरसेवक जयकुमार माळगे, अनिल ता. मधाळे, डॉ. स्वप्नील हुपरीकर, सुभाष मधाळे, विद्याधर कांबळे, दिलीप शिंगाडे, मोहन टेलर, भरत माणकापूरे, प्रणित मधाळे, सुमित कांबळे यांनाच द्यावे लागेल. 

शिविमुक्त आचारसंहिता... 

  • दारू पिऊन येणाऱ्यास मज्जाव 

  • दारू पिल्यास पोलिसांत देणे 

  • कुणीही हातात दगड घ्यायचा नाही 

  • अर्वाच्य शिवीगाळी घोषणा टाळणे 

नामदेव शिंदे यांचेही कौतुक 
हुपरीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. पट्टणकोडोली, इंगळी गावे संवेदनशील असताना वरिष्ठांनी जादा कुमक देण्याचे नाकारत सहाय्यक निरिक्षक श्री. शिंदे यांनी जनतेशी थेट संवाद साधत उपलब्ध बळावर स्थिती कुशलपणे हाताळली. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. शिंदे यांचेही कौतुक होत आहे. 
 

Web Title: Kolhapur News Social reconciliation in Hupari Bandh