कोल्हापूरः मुलाकडून आईचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले तुकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : येथील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीमध्ये मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

यलव्वा रामा कुचकोरवी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनील कुचकोरवी
 याने आईचा खून केला. खून करून मृतदेहाचे तुकडे करून परातीमध्ये भरून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला अटक करत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

आज (सोमवार) अडीचच्या सुमारास घरातून रक्त बाहेर येत असल्याने शेजारच्यांना याबाबत संशय आला. शेजारी राहणाऱयांनीच आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा सेंट्रींगचे काम करत असून, दारुच्या नशेतून त्याने हे कृत्य केले आहे. आरोपीला कंटाळून त्याची पत्नी आणि मुले मुंबईला राहायला गेले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

Web Title: kolhapur news son killed mother

टॅग्स