#MPSC सोनी शेट्टी राज्यात मुलींमध्ये तिसऱ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम आले.

कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम आले.

इचलकरंजी येथील पूजा कोंडिराम शिंदे यांनी एसटी प्रवर्गात मुलींमध्ये पाचवा क्रमांक मिळविला. अरुण नरके फाऊंडेशन, ए. बी. फाऊंडेशन, युनिक ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत झेंडा फडकवला. 

उदय यांनी सातवीपर्यंत प्राथमिक विद्यामंदिर, तर भारती विद्यापीठ प्रशालेतून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांना दहावीला ७९ व बारावी विज्ञान शाखेतून ५९ टक्के गुण मिळाले. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातून त्यांनी बी. एस्सी.ची (प्राणीशास्त्र) पदवी घेतली. त्यांनी तेरा ते चौदा तास अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. सोनी या वाणिज्य शाखेची पदवीधर आहेत. त्यांनी २०१४ पासून अभ्यासास सुरवात केली. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. 

पूजा वाणिज्य शाखेची पदवीधर असून, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांनी २०१४ पासून अभ्यासास सुरवात केली होती. खासगी क्‍लासमध्ये दहा ते बारा तास अभ्यास केला. 

राहुल मूळचे सरूड (ता. शाहूवाडी) येथील आहेत. 
सध्या तो पाचगावमध्येच राहतो. त्याचे वडील पोलिस होते.  तो भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी (आयटी) शाखेत विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. तो तिसऱ्या प्रयत्नात पीएसआय झाला. 

अन्य यशस्वी असे : नीलम महादेव पाटील (सोनाळी, ता. करवीर), तेजस्विनी रामचंद्र पाटील (मांगेवाड, ता. राधानगरी), वृषाली विलास चव्हाण (तळसंदे, ता. हातकणंगले), वैशाली माणिक कदम (मालेगाव, मिरज), सुप्रिया प्रकाश जाधव (कौलव, ता. राधानगरी), सुजाता तुकाराम पाटील (शिराळे तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी), विश्‍वजित बाळासाहेब फराकटे (बोरवडे, ता. कागल), तानाजी बिंदू अडसुळे (साईनाथ पार्क, पाचगाव), सचिन दगडू भिलारी (काटेभोगाव, ता. पन्हाळा), अजिंक्‍य अमर मोरे (उजळाईवाडी), विनया केसरकर (सरळी, आजरा), प्रशांत वसंत जाधव (पासेवाडी, ता. खानापूर), सागर संजय पाटील (खेड, ता. शिराळा), अविनाश श्रीकांत गवळी (निलजी, ता. गडहिंग्लज), युनूस चाँदसाहेब इनामदार (शिगाव, ता. वाळवा), निखिल श्रीपती मगदूम (हळदी, ता. करवीर), संजय नारायण पाटील (चिखलवाल, ता. चिकोडी), प्रमोद बाळासाहेब पाटील (पोहाळे-बोरगाव, ता. पन्हाळा), हणमंत दत्तात्रय नकाते (नांदेड), हरिश अशोक पाटील (तेरवाड, ता. शिरोळ), अनिकेत गुलाबरा शिंदे (कोकळे, ता. कवठेमहांकाळ), सचिदानंद शेलार (मंगळवार पेठ, कोल्हापूर), अमित गणपती पाटील (सांगली), नीलेश शिवाजी वाडकर (कसबा बीड, ता. करवीर), अभिजित माणिक पाटील (मांगले, ता. शिराळा), सागर सुभाष झडे (परभणी), संतोष शिवाजी यादव (कंदलगाव, ता. करवीर), सुनील बाळासाहेब पवार (सोलापूर), बालाजी ज्ञानेश्‍वर पवार (सोलापूर), विशाल गजेंद्र येळेकर (सोलापूर), हणमंत संभाजी पवार (लाटवडे, ता. हातकणंगले), सचिन रेडेकर (थेरगाव, ता. शाहूवाडी), नरेश अशोक पंडित (औरंगाबाद), रवींद्र रानभिसे, आफरिन अब्दुल बागवान (तुंरबे, ता. राधानगरी), स्नेहल विलास चव्हाण (कणेरीवाडी, ता. करवीर), स्नेहल संदीप चरापले (शिराळा, जि. सांगली), ऋतुजा राजेंद्र मोहिते (धनगाव, भिलवडी, ता. पलूस), रिजवाना लालसाब काकेरी (रत्नागिरी)

पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याचा आनंद आहे. हे यश माझ्या शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे आहे. ज्यांनी मला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. 
- उदय विष्णू पाटील

लहानपणापासून वर्दी परिधान करण्याची मनीषा होती. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्याने सैन्य दलाची वाट बंद झाली होती. पोलिस उपनिरीक्षक होण्याचे ठरवले होते.  
- सोनी शेट्टी

माझ्या वडिलांचे मी पोलिस उपनिरीक्षक व्हावे, असे स्वप्न होते. त्यामुळे अभियांत्रिकीनंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरवात केली. आज माझे यश पाहण्यासाठी ते हवे होते. 
- राहुल चंद्रकांत आपटे 

पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याचा आनंद मोठा आहे. कठोर अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणे शक्‍य असते. 
- पूजा कोंडिराम शिंदे

Web Title: Kolhapur News Soni Shetty third in state MPSC result