कोल्हापूरास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा बसला. अंगावर शहारे येतील, असा विजांचा लखलखाट होता. पन्हाळा तालुक्‍यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला; तर शिराळा तालुक्‍यात भिंत अंगावर कोसळून वृद्धेचा मृत्यू झाला. 

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा बसला. अंगावर शहारे येतील, असा विजांचा लखलखाट होता. पन्हाळा तालुक्‍यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला; तर शिराळा तालुक्‍यात भिंत अंगावर कोसळून वृद्धेचा मृत्यू झाला. 

वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍याला बसला. तेथे लाखोंचे नुकसान झाले. यड्राव येथे छत कोसळून चार कामगार जखमी झाले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे, छत उडून गेले. अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या. खांब पडले. काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मरही पडले. त्यामुळे शहरासह अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होता. शहरात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे पडली. भिंती पडल्या. तारा तुटल्या. घरांचे पत्रे उडून गेले. गाड्यांची मोडतोड झाली. रात्री एकच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरु झाला. 

नुकसान सत्र

 •     झाड उन्मळून पडल्याने ताराबाई रोड बंद
 •     लक्षतीर्थ वसाहत येथे घराचे छत उडाले
 •     राजारामपुरीत वाहनांवर झाडाच्या फांद्या 
 •     यड्राव येथे छत कोसळून चार कामगार जखमी
 •     इचलकरंजीसह परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
 •     इचलकरंजीत अनेक घरांसह यंत्रमाग कारखान्यावरील पत्रे उडून गेले
 •     कबनुरात वीज खांब तुटून पडले
 •     माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथे पोल्ट्री शेडचे पत्रे उडून आठ लाखांचे नुकसान
 •     भुदरगड तालुक्‍यातील मुरुक्‍टे परिसरात गारपीट 
 •     आजरा तालुक्‍यातील सुळेरान पैकी धनगरमोळ्यात वीज कोसळून तीन म्हशींचा मृत्यू
 •     राशिवडे बुद्रुक परिसरात भात, सूर्यफूल शेतीचे मोठे नुकसान
Web Title: Kolhapur News stormy wind and rains affect City