संपाचा फटका शेतकऱ्यांनाच अधिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

दूध, भाजीपाला आवक घटल्याचा परिणाम - बाजार समितीलाही महसुलावर सोडावे लागले पाणी

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १ जूनपासून  शेतकऱ्यांनीच पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. दूध संकलन रखडले, भाजीपाला, फळांची आवक घटली, त्यातून मोठे नुकसान झाले. बाजार समितीलाही सेसच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलावर या सात दिवसांत पाणी सोडावे लागले. 

दूध, भाजीपाला आवक घटल्याचा परिणाम - बाजार समितीलाही महसुलावर सोडावे लागले पाणी

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १ जूनपासून  शेतकऱ्यांनीच पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. दूध संकलन रखडले, भाजीपाला, फळांची आवक घटली, त्यातून मोठे नुकसान झाले. बाजार समितीलाही सेसच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलावर या सात दिवसांत पाणी सोडावे लागले. 

दरम्यान, आजपासून बाजार समितीतील व्यवहारासह दूध संकलन सुरळीत सुरू झाले. गेले सात दिवस या संपाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात शासकीय मालमत्तेचे नुकसान, एसटी, केएमटीची मोडतोड यासारख्या घटना घडलेल्या नाहीत. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला होता. काल (ता. ७) हा संप संपला. पहिल्या दोन दिवसांत या संपाची धग कोल्हापुरातही जाणवत होती.

त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा याची तीव्रता वाढवण्यात आली. ५ जूनला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदलाही कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण गेल्या सात दिवसात भाजीपाल्याचे सौदे न होणे, दूध संकलन थांबणे, भाजीपाल्याची नासधूस, दूध रस्त्यावर ओतणे यासारख्या प्रकारांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सात दिवसांत सुमारे चार कोटी रुपयांचे व्यवहारच झाले नाहीत. त्यामुळे समितीला सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. या शिवाय समितीच्या आवारात भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा यांच्या नासधुसीतून झालेले नुकसान वेगळेच. 

दूध बंदमुळे सर्वाधिक भुर्दंड
जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लिटर दूध संकलन होते. यात ‘गोकुळ’चे दहा लाख, वारणा’चे चार तर इतर संघाचे मिळून एक लाख लिटर दूध संकलनाचा समावेश आहे. संपाच्या काळातील पहिल्या दिवसांपासून या दररोज एक लाख लिटर संकलन झालेच नाही. ५ जूनला शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच संघांनी संकलन बंद केले. यामुळे किमान २१ लाख लिटर दूध संकलित झाले नाही, परिणामी या दुधाचा सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसला आहे.

Web Title: kolhapur news strike loss to farmer