विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

दहावीच्या गुणपत्रिकांचे वाटप - तीन जुलैपासून प्रक्रियेस सुरुवात
कोल्हापूर - दहावीच्या गुणपत्रिका आज हाती पडल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते अकरावी प्रवेशाचे. येत्या तीन जुलैपासून केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होत आहे.

दहावीच्या गुणपत्रिकांचे वाटप - तीन जुलैपासून प्रक्रियेस सुरुवात
कोल्हापूर - दहावीच्या गुणपत्रिका आज हाती पडल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते अकरावी प्रवेशाचे. येत्या तीन जुलैपासून केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होत आहे.

दहावीचा निकाल उशिराने जाहीर झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू होत आहेत. तीन ते आठ जुलैअखेर प्रवेश अर्जांचे वितरण व स्वीकृती होईल. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज घेताना दहावीची मूळ गुणपत्रिका सोबत असणे आवश्‍यक आहे. कोणत्याही तीन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्राधान्य देता येईल. माहिती पुस्तिकेत प्रत्येक महाविद्यालयाचे प्रवेश गेल्या वर्षी किती टक्‍क्‍यांना (कट ऑफ पाँइट) बंद झाले याची माहिती असेल. त्याची खात्री करूनच प्राधान्यक्रम निश्‍चित करावेत. नऊ ते सोळा जुलैअखेर अर्जांची छाननी होईल. सतरा जुलैला पहिली निवड यादी प्रसिद्ध होईल. अठरा जुलैला एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. तिन्ही शाखेसाठी अर्जाचे रंग वेगळे आहेत. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा. प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून होत असल्याने एकेका टक्‍क्‍यांसाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. अमूक एका महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र केंद्रीय प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे.

उद्‌बोधन वर्ग बुधवारपासून
प्रवेश नेमकी कशी आहे, याची माहिती देण्यासाठी बुधवारपासून (ता. २८) उद्‌बोधन वर्गास सुरवात होत आहे. सकाळी साडेदहा ते साडेबारा ते साडेबारा विवेकानंद महाविद्यालय दुपारी तीन ते सहा केएमसी कॉलेज, दुसऱ्या दिवशी सकाळी गडकरी हॉल (पेटाळा), दुपारी कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले जाईल.

गुणपत्रिकेसोबत कलही कळाला
दहावीच्या मूळ गुणपत्रिकांचे आज शाळांतून वाटप झाले. गेल्या वर्षापासून शासनाने कल चाचणीचा निकालही सोबत दिला आहे. रंगीबेरंगी छपाई आणि संबंधित विद्यार्थ्याचा कल नेमका कोणत्या क्षेत्राकडे आहे, याची माहिती आलेखाद्वारे देण्यात आली आहे. गुणपत्रिकेसाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

अर्ज वितरण केंद्रे 
कोल्हापूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (खरी कॉर्नर)
स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर)
कॉमर्स कॉलेज (आझाद चौक)
कमला महाविद्यालय (राजारामपुरी १ ली गल्ली)
विवेकानंद महाविद्यालय (ताराबाई पार्क)
महावीर महाविद्यालय (न्यू पॅलेस परिसर)

संकलन केंद्रे 
महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज (शिवाजी पेठ)
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर)
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी, गंगावेस)
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय
राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय (कदमवाडी)
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (ताराबाई पार्क)
शहाजी छत्रपती महाविद्यालय (दसरा चौक)

Web Title: kolhapur news student eleventh admission