वीट फेकून मारल्याने विद्यार्थी जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - वर्गात मोबाईलचा वापर केल्याच्या रागातून आयटीआयमधील शिक्षकाने विद्यार्थ्यास वीट फेकून मारली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी आज येथे केला आहे. अथर्व विजय गायकवाड (वय १८, रा. सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

कोल्हापूर - वर्गात मोबाईलचा वापर केल्याच्या रागातून आयटीआयमधील शिक्षकाने विद्यार्थ्यास वीट फेकून मारली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी आज येथे केला आहे. अथर्व विजय गायकवाड (वय १८, रा. सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

सानेगुरुजी वसाहत येथील विजय गायकवाड यांनी मुलगा  अथर्वला औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्लबिंगच्या कोर्सला घातले. ते म्हणाले, ‘‘अथर्व आयटीआयला गेला होता. शिक्षक वर्गात नसल्याने तो मोबाईलवर गाणी ऐकत होता. वर्गात तासिका शिक्षक राज घोडके आले. अथर्वच्या हातातील मोबाईल पाहून ते रागावले. त्यांनी मोबाईल काढून घेतला. विनंती करूनही त्यांनी तो परत दिला नाही. त्यामुळे अथर्व दुसऱ्या शिक्षकांना सांगण्यास वर्गातून बाहेर पडला. ते पाहून घोडके चिडले. त्यांनी वीट फेकून मारली. ती त्याच्या डोक्‍यात लागल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला. जखमी अथर्वला शिक्षकांनी परस्पर खासगी रुग्णालयात नेले. त्याची माहिती मिळाल्यानंतर मी रुग्णालयात गेलो. मात्र, त्यापूर्वी तेथून ते बाहेर पडले होते. मुलाची अवस्था पाहून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.’’

शिक्षकाकडून मात्र आरोपांचा इन्कार
दरम्यान, वर्गात आल्यानंतर अथर्व नियमबाह्य वर्तन करत होता. मी त्याला अटकाव केला. त्याने ‘अरे- तू रे’ची भाषा करत माझ्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करत असताना तो पाईपमध्ये अडकून खाली पडला. त्यात तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेऊन उपचार केल्याचे शिक्षक राजरत्न घोडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते.

Web Title: Kolhapur News Student wounded after throwing brick