साखर दरात वाढीची कारखानदारांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

कोल्हापूर - दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. शेतीचाही उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा उसाची एफआरपी २०० रुपयाने वाढवली आहे. ही बाब निश्‍चित स्वागतार्ह आहे; मात्र साखरेचे दरातही वाढ करावी, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे.

गतवर्षीची एफआरपी जाहीर करताना साखरेचे प्रतिक्विंटलचे दर ३२०० रुपये होते. गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर हाच दर २४०० ते २५०० पर्यंत खाली आला. त्यामुळे कारखान्यांना उसाची एफआरपी देता आली नाही. असे चित्र या वर्षी नसावे, यासाठी साखरेच्या दरातही चांगली वाढ केली पाहिजे, अशी मागणीही केली जात आहे.

प्रत्येक वर्षी एफआरपीमध्ये वाढ झाली पाहिजे यात शंका नाही. एफआरपीमध्ये वाढ करताना साखरेचा दरही वाढला पाहिजे. आता कच्च्या मालाचा दर जास्त आणि पक्‍क्‍या मालाचा दर कमी अशी स्थिती असते. याला आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तत्काळ मिळण्यासाठी साखर दरात वाढ केली पाहिजे.
- हसन मुश्रीफ,
आमदार

केंद्र सरकारने एफआरपीत केलेली वाढ स्वागतार्ह आहे. उत्पादनखर्च वाढत आहे. त्यामुळे एफआरपी वाढली पाहिजे. दरम्यान, एफआरपीमध्ये वाढ करत असताना साखरेच्या दरातील वाढ निश्‍चित होणे अपेक्षित आहे. साखरेचे दर चांगले राहिले तर उसाला चांगला दर देण्यासही अडचण येणार नाही.
- चंद्रदीप नरके,
आमदार

Web Title: Kolhapur News sugar factory owner demand hike in sugar rate