साखर मुल्यांकन वाढल्याने आगामी हंगामासाठी कारखानदारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

सांगली - साखर उद्योगाला सावरण्यासाठी राज्य बॅंकेनेही आश्‍वासक पावले उचलली आहेत. यामुळे येणारा कारखान्यांचा हंगाम नक्कीच समाधानकारक जाईल असा आशवाद राज्य बॅंक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

राज्य बॅंकेने मुल्यांकनात नुकतीच प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे 2700 रुपयावरुन मुल्यांकन 2900 रुपये इतके झाले आहे. मालतरण कर्जासाठी आवश्‍यक असणारा दुरावा हा 15 टक्के वरुन 10 टक्के आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांना साखर मालतारणापोटी 2900 रुपये इतक्‍या दरावर 10 टक्के दराने 2610 रुपये इतकी रक्कम कर्जापोटी जमा होईल.

यामध्ये कारखान्यांना येणे कर्जापोटी 500 रुपये अधिक प्रक्रीया कर्जापोटी 250 अशी 750 रुपये वजावट करुन 1860 रुपये कारखान्यांना उपलब्ध होइल. यापुढे जावून बॅंकेने आणखीन एक चांगला निर्णय घेतला आहे. साखर मालतारण कर्जापोटी राखून ठेवलेल्या 10 टक्के दुराव्याची रक्कम संबधित कारखान्यांना हवी असल्यास त्यांनी त्या पोटी कारखान्याची किंवा कारखान्यांच्या संचालकांची अतिरिक्त मालमत्ता राज्य बॅंकेच्या तारणात दिल्यास त्यांना साखर मालतारणापोटी शंभर टक्के देण्याचाही निर्णय घेतला आहे. राज्य बॅंकेने साखर दर वाढताच तातडीने मुल्यांकन वाढवले आहे. याचा फायदा पुढील गळीतास होणार आहे. पुढील हंगामासाठी पूर्व हंगामी कर्ज देणे राज्य बॅंकेस शक्‍य होणार असल्याने कारखाने वेळेत सुरु होवून पुढचा गळीत हंगाम सुरळीत रहाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे श्री अनास्कर यांनी सांगितले.

शार्ट मार्जिन झाले कमी...

सध्या साखर किरकोळ विक्री दर 3500 तर घाऊक दर 2950 रुपयांवर आहे. दरात आणखी वाढीची तातडीने शक्‍यता नाही. दरवाढींने शार्ट मार्जिन कमी होण्यास मदत झाली आहे.

Web Title: Kolhapur News Sugar rate issue