हेमरसकडे जाणारा ऊस रोखला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

चंदगड  - गतवर्षीच्या उसाला तीनशेचा अंतिम हप्ता मिळावा या मागणीसाठी तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते जनआंदोलन कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटलेले आहेत. काही शेतकरी आज ऊस कारखान्याला घालवण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळले. या पार्श्‍वभूमीवर तुर्केवाडी भागातून हेमरस कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रक पाटणे फाटा येथे आज कार्यकर्त्यांनी अडवले.

आमरोळी (ता. चंदगड) येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्‍टर रोखून टायरमधील हवा सोडली. अंतिम दराबाबत शनिवारी (ता. 4) कारखानदार निर्णय देणार असून तोपर्यंत ही वाहने रस्त्यातच रोखून धरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

तालुक्‍यात हेमरस (ओलम), इको केन शुगर (दौलत) आणि न्यूूट्रियन्ट्‌स कंपनी संचालित दौलत कारखान्याने गतवर्षीच्या उसाचा अंतिम हप्ता देण्याबाबत अनिश्‍चितता दर्शवली आहे. या सर्वच कारखान्यांनी तीनशेचा अंतिम हप्ता द्यावा व या वर्षीच्या उसाचा दर जाहीर करावा या मागणीसाठी जनआंदोलन कृती समितीने गळीत हंगाम थांबवला आहे. काल (ता. 31) येथे तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी कार्यकर्त्यांनी कारखानदारांना दर जाहीर करण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली होती. तोपर्यंत या कारखान्यांनी ऊस तोडणी थांबवावी अन्यथा वाहतूक रोखण्याचा इशारा दिला होता. तरीही आज हेमरस कारखान्याने ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पाटणे फाटा येथे ही वाहतूक रोखली. ट्रक चालकाला समजावून सांगितले. दराचा निर्णय होईपर्यंत ही वाहने याच ठिकाणी अडवून ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काल (ता. 31) रात्री आमरोळी येथून ट्रॅक्‍टरमधून ऊस वाहतूक सुरू होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ती रोखली. ट्रॅक्‍टर अडवून पुढच्या चाकातील तसेच ट्रॉलीतील हवा सोडली. हा लढा शेतकऱ्याच्या हिताचा असून त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे. ऊस तोड करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, अशी विनंती केली आहे. 

Web Title: Kolhapur News Sugarcane rate issue

टॅग्स