बारावी निकालाच्या धास्तीने विद्यार्थ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

इचलकरंजी - बारावी परीक्षेचा निकाल काय लागेल या चिंतेने ग्रस्त झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिक महेश जोशी (वय 18) असे त्याचे नाव आहे. ही दुर्देवी घटना येथील स्वामी अपार्टमेंटमध्ये आज सकाळी उघडकीस आली आहे.

कार्तिक हा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होता. त्याने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यापासून तो परीक्षेचा निकाल काय लागेल या चिंतेने ग्रस्त झाला होता. यातूनच त्याने मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात छताच्या हुकाला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. याची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

Web Title: Kolhapur News Suicide incidence in Ichalkaraji