उत्तरप्रदेशातील एकाची इचलकरंजी येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

इचलकरंजी - उत्तरप्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवाराने येथील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अरूणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ रा. भीमपूर, ता. बदलापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. आर. के. नगर, सांगली नाका, यड्राव, ता.शिरोळ) असे त्याचे नाव आहे.

इचलकरंजी - उत्तरप्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवाराने येथील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अरूणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ रा. भीमपूर, ता. बदलापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. आर. के. नगर, सांगली नाका, यड्राव, ता.शिरोळ) असे त्याचे नाव आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झाल्याच्या निराशेतून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे. 

याविषयी पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत अरूणकुमार उपाध्याय याने गेल्या वर्षी झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीसाठी भारतीय जनात पक्षाकडून "मडियाहू' या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. पण भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यात ते पराभूत झाले. या दिवसापासून उपाध्याय नैराश्‍यग्रस्त होते. त्यांचा तणाव दूर व्हावा याकरीता वीस दिवसापूर्वी त्यांच्या येथे राहत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना येथे आणले होते. त्यांचे नातेवाईक आर. के. नगर सांगली नाका परिसरातील सुनिल बळवंत पाटील यांच्या भाड्याच्या घरात राहत आहेत.

काल रात्री उपाध्याय जेवण न करता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी खोलीच्या फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उठविण्यासाठी नातेवाईक गेले असता त्यांना उपाध्याय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. 

Web Title: Kolhapur News Suicide incidence in Ichalkaranji