इचलकरंजी नगरपालिकेच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

राजेंद्र होळकर
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - नगरपालिकेतील लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तो बुधवार ( ता. 31 ) पासून बेपता होता.

इचलकरंजी - नगरपालिकेतील लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तो बुधवार ( ता. 31 ) पासून बेपता होता.

खासगी सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून या कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. एका खासगी सावकाराने त्याला पैश्याच्या वसुलीवरुन धमकीही दिली होती, या धमकीच्या भीती पोटी तो बेपता झाला होता, असेही सांगण्यात येत आहे

चाँद बालेखान समडोळे (रा. पालिका कामगार चाळ, खंजीरे मळा, इचलकरंजी) असे त्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या आत्महत्येच्या घटनेने सहकारी कर्मचाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे.

नगरपालिकेच्या लेखा विभागातच चाँद समडोळे या कमचाऱ्यांने आत्महत्या केल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. तसेच नगरपालिकेच्या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. त्याने रात्री आत्महत्या केली असून, हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे आदी पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

Web Title: Kolhapur News Suicide incidence in Ichalkaranji