उत्पन्नाचे हमीपत्र देणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

इचलकरंजी - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत कमी दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येते. मात्र अनेक पात्र केशरी शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासुन वंचित राहीले आहेत. अशा शिधापत्रिकाधारकांना शहरी भागात वार्षिक 59 हजार रूपये तर ग्रामीण भागात वार्षिक 44 हजार रूपये उत्पन्न असलेबाबतचे हमीपत्र सादर केल्यास त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत कार्डावरील मानसी 5 किलो धान्य मिळणार आहे.

इचलकरंजी - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत कमी दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येते. मात्र अनेक पात्र केशरी शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासुन वंचित राहीले आहेत. अशा शिधापत्रिकाधारकांना शहरी भागात वार्षिक 59 हजार रूपये तर ग्रामीण भागात वार्षिक 44 हजार रूपये उत्पन्न असलेबाबतचे हमीपत्र सादर केल्यास त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत कार्डावरील मानसी 5 किलो धान्य मिळणार आहे. या हमीपत्राचा नमुना भाजप कार्यालय, हुलगेश्वरी रोड, विरशैव बँक समोर, इचलकरंजी येथे उपलब्ध असून नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे. 

अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासुन इचलकरंजी शहरातील शिधापत्रिकाधारक मोठया प्रमाणात स्वस्त धान्यापासुन वंचित राहीले होते. ही बाब आमदार सुरेश हाळवणकर यांनी वारंवार विधानसभेच्या माध्यमातुन व मंत्री महोदयांची भेट घेवून निदर्शनास आणली होती. व वंचित लाभार्थ्यांना धान्य मिळवुन देण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती वेळोवेळी केली होती. या मागणीची दखल घेवून अखेर शासनाने इष्टांकात वाढ केली असुन याचा फायदा इचलकरंजीसह राज्यातील सर्वच शिधापत्रिका धारकांना होणार आहे. त्याबट्ठल आमदार सुरेश हाळवणकर यांनी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेवुन आभार व्यक्त केले.

 

Web Title: Kolhapur News Suresh Halvankar comment