#MarathaKrantiMorcha स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा मराठा आंदोलनास पाठींबा

सुनील पाटील
सोमवार, 30 जुलै 2018

कोल्हापूर - येथे मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच ते आज दसरा चाैक येथे आयोजित ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.

कोल्हापूर - येथे मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच ते आज दसरा चाैक येथे आयोजित ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी बोलताना खासदार राजू शेटटी म्हणाले, मराठा समाजाने स्वत:च्या न्याय व हक्कासाठी आजपर्यंत सयंमाने मोर्चे व आंदोलने काढली आहेत. सरकारने या गोष्टीकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच सध्या या अहिंसेच्या आंदोलनाचे रुपांतर  आता उद्रेकात झाले आहे. मला मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण करायचे नसून मी संसदेमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबर कर्नाटकातील वक्कलीग समाज, उत्तरप्रदेश-पंजाब-हरियाणातील जाट समाज, गुजरातमधील पाटीदार, आंध्रमधील रेडडी या सर्व शेतकरी व सर्वसामान्य असलेल्या समाजाला आरक्षण देण्यासाठी मी संसदेत आवाज उठविला आहे.

यावेळी मराठा समाजाच्यावतीने खासदार राजू शेटटी यांनी आरक्षणासंदर्भात संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवून अनेक मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. हातकंणगले येथील घडलेल्या घटनेबद्दल मराठा मोर्चाचे प्रमुख दिलीप देसाई यांनी दिलगीरी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे शिवाजीराव राणे यांनी खासदार राजू शेटटी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी मोठे काम केले असून शेतकरी आंदोलनातून मराठा समाजासह बाराबलुतेदार समाजातील लोकांना सक्षम केले आहे.

Web Title: Kolhapur News swabhimani support to Maratha agitation