स्वाईन फ्लू... घ्या खबरदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - राज्यातील इतरत्र भागात व शहरात तुरळक स्वृरूपात स्वाईन फ्लू (इन्फ्ल्यूएंझा ए एच१ एन१) रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा प्रसार शहरात वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोल्हापूर - राज्यातील इतरत्र भागात व शहरात तुरळक स्वृरूपात स्वाईन फ्लू (इन्फ्ल्यूएंझा ए एच१ एन१) रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा प्रसार शहरात वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सामान्य वाटणारा ताप, सर्दी खोकला अंगावर काढू नका. उशीर न करता डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. स्वाईन फ्लू लक्षणे असल्यास गर्दीत जाणे टाळा. शक्‍यतो जनसंपर्क कमी करा. मधुमेह, हृदयरोग अथवा इतर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घेतल्यास धोका टळतो, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: kolhapur news swine flu care