लाच घेताना कागल तहसीलदारासह दोन तलाठ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापूर - सातबारावर नाव नोंदणासाठी अडीच लाखांची लाच घेणाऱ्या कागलचा तहसिलदार किशोर घाटगेसह दोन तलाठ्यांना आज अटक करण्यात आली.

कोल्हापूर - सातबारावर नाव नोंदणासाठी अडीच लाखांची लाच घेणाऱ्या कागलचा तहसिलदार किशोर घाटगेसह दोन तलाठ्यांना आज अटक करण्यात आली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तहसिलदार किशोर वसंतराव घाटगे, तलाठी शमशहाद दस्तरीग मुल्ला (सज्जा सुळकूळ) आणि तलाठी मनोज आण्णासो भोजे (सज्जा एकोंडी.ता.कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुपारी चारच्या सुमारास कागल तहसिल कार्यालयात लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडल्याचे अधीक्षक गिरीष गोडे यांनी सांगितले. खुद्द महसूल मंत्र्यांच्या कोल्हापुरातच आज ही घटना घडली. महसूल मधील भ्रष्टाचाराची साखळीच आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणली आहे.

Web Title: Kolhapur News tahasidar arrested in bribe case