कोल्हापुरातून आज ‘टेक ऑफ’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोल्हापूर - सहा वर्षांच्या खंडानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासून सुरू होणार आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवासच केला नाही, अशा काही जणांना विमानात बसण्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दोन अपंग, अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसह दोन शेतकरी दाम्पत्य, कचरावेचक महिलांनाही संधी मिळणार आहे.

कोल्हापूर - सहा वर्षांच्या खंडानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासून सुरू होणार आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवासच केला नाही, अशा काही जणांना विमानात बसण्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दोन अपंग, अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसह दोन शेतकरी दाम्पत्य, कचरावेचक महिलांनाही संधी मिळणार आहे. कोल्हापूर उद्योग जगतातील उद्योजक, व्यापारीही या पहिल्या विमानातून प्रवास करतील.

कोल्हापूरच्या पर्यटन, उद्योग आणि व्यापार वाढीसाठी कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणे गरजेचे होते. यासाठी खासदार महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने उद्यापासून ही विमान सेवा सुरू होत आहे. मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या या विमानात कोल्हापूर उद्योग जगतातील उद्योजक, व्यापारी असणार आहेत. यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई, स्मॅक, गोशिमा, हॉटेल मालक संघ यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह ज्यांनी आयुष्यात विमान जवळून पाहिले नाही अथवा जे विमानातच बसले नाहीत, अशांना विमानात बसण्याची संधी मिळणार आहे.

जे कधी विमानात बसलेले नाहीत अशा लोकांना मुंबई-कोल्हापूर विमान प्रवास घडविला जाईल. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हावा, यासाठीच हा उपक्रम राबवत आहे.
- धनंजय महाडिक,
खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Take of Today