गायकवाड इलेव्हन, कोल्हापूर क्विन्स उपांत्य फेरीत

संदीप खांडेकर
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - ताराराणी चषक टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत गायकवाड इलेव्हन, कोल्हापूर क्विन्स, रि ग्रीनने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहूपुरी जिमखाना व शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर स्पर्धा सुरू आहे.

कोल्हापूर - ताराराणी चषक टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत गायकवाड इलेव्हन, कोल्हापूर क्विन्स, रि ग्रीनने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहूपुरी जिमखाना व शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर स्पर्धा सुरू आहे.

गायकवाड इलेव्हनने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १३८ धावांचे आव्हान रणरागिणी कल्बसमोर ठेवले. त्यांच्या गौतमी नाईकने नाबाद ४५ धावा फटकाविल्या. रोहिणी मानेने २० व प्रिया भोकरेने १२ धावांचे योगदान दिले. रणरागिणी क्लबकडून साक्षी बनसोडेने ३, प्रसिद्धी जोशी २ व मानसी बोर्डे हिने एक गडी बाद केला. रणरागिणी क्लबला ६ गडी गमावून ८२ धावा करता आल्या. साक्षी वाघमोडेने १७, अंबिका वाताडेने १६ धावा केल्या. गायकवाड इलेव्हनकडून ज्योती शिंदे व रोहिणी माने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कोल्हापूर क्विन व कर्नाटक यांच्या सामन्यात कोल्हापूर क्विनने ८ गडी गमावून १३९ धावा केल्या. अनुजा पाटीलने ३६ चेंडूत ६९ धावा फटकाविल्या. चैत्राली बलकवडेने १७ व सुवर्ण शिंदेने १५ धावा केल्या. कर्नाटककडून विजया सुरेंद्रन हिने ३, लिखिता दोन व चंद्राने एक गडी तंबूत परतवला. कर्नाटकचा डाव १०९ धावांत आटोपला. कशिश शर्माने २२, चंद्राने २० व दिव्याने १२ धावा केल्या. अनुजाने गोलंदाजीत कमाल करत ५ गडी बाद केले. दर्श रजपूतला दोन गडी बाद करता आले.

पंढरपूर आणि रि ग्रीन यांच्यातील सामन्यात  पंढरपूरचा डाव १६ षटकांत ५३ धावांतच गडगडला. जाई देवण्णावरने १२ व साईना पटेलने ११ धावा केल्या. रि ग्रीनकडून निकिता आगेने ४, वैष्णवी रावळीया व ऋतुजा देशमुख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रि ग्रीनने ७.१ षटकांत बिनबाद ५४ धावा फटकावून सामना जिंकला. अदिती गायकवाड हिने नाबाद २९ व वैष्णवी रावळीयाने नाबाद २४ धावा केल्या.

सामनावीर : 
- गौतमी नाईक, अनुजा पाटील, वैष्णवी रावळीया.

Web Title: Kolhapur News Tararani Chashak T - 20 Cricket competition