तावडे हॉटेल भागातील अनधिकृत बांधकामप्रश्‍नी ‘जैसे थे’चा आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कोल्हापूर - तावडे हॉटेल अनधिकृत बांधकामप्रश्‍नी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज ‘जैसे थे’चा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उचगाव ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कोल्हापूर - तावडे हॉटेल अनधिकृत बांधकामप्रश्‍नी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज ‘जैसे थे’चा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उचगाव ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उचगाव ग्रामपंचायतीसह अन्य दोघांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही जागा उचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. त्यामुळे महापालिकेस कारवाई करता येणार नाही, असे त्यात म्हटले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये हद्द नेमकी कोणाची आहे, यासंबंधी राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते.

अपील दाखल करून घेतले आहे. याप्रकरणी ‘जैसे थे’ असा आदेश मिळाला आहे.
- नरेंद्र गांधी, 

उचगाव ग्रामपंचायतीचे वकील

जिल्हाधिकाऱ्यांनी हरकती मागवून सुनावणी घेतली. ही जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याचा अहवाल दिला. २०१४ पर्यंतच्या बांधकामांबाबत निकाल दिला गेला. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली. नंतर बांधकामे झाली, त्यास न्यायालयाने स्थगिती दिली नाही. २०१४ नंतरच्या बांधकामांवर हातोडा घालण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. राज्य शासनाने बांधकामे नियमित करण्याची भूमिका घेतली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे निर्णय मागे घेतला. 

हद्दीच्या मूळ याचिकेलाच सर्वोच्च न्यायालयाने आज ‘जैसे थे’चा आदेश दिला. ट्रक टर्मिनस, कचरा डेपोसह अन्य आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकाम झाल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. तावडे हॉटेल ते गांधीनगर या मार्गावर बांधकामे झाली आहेत. ही जागा सुमारे अडीचशे एकर इतकी आहे.
 

Web Title: Kolhapur News Tawade hotel illegal construction