बदली धोरणामुळे शिक्षक अस्वस्थ 

राजेंद्र पाटील
शनिवार, 22 जुलै 2017

कोल्हापूर - बदलीच्या धोरणात वारंवार होणारे बदल, बदल्या नेमक्‍या कशा पद्धतीने होणार, ऑनलाईन अर्ज कोणी, कधी भरायचे याची स्पष्ट माहिती सांगितली जात नाही. केवळ सोशल मीडियाद्वारे कोणीही टाकलेल्या पोस्टद्वारेच बदलीची प्रक्रिया सुरू आहे. अशा गूढ धोरणामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक वर्ग अस्वस्थ झाला आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर - बदलीच्या धोरणात वारंवार होणारे बदल, बदल्या नेमक्‍या कशा पद्धतीने होणार, ऑनलाईन अर्ज कोणी, कधी भरायचे याची स्पष्ट माहिती सांगितली जात नाही. केवळ सोशल मीडियाद्वारे कोणीही टाकलेल्या पोस्टद्वारेच बदलीची प्रक्रिया सुरू आहे. अशा गूढ धोरणामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक वर्ग अस्वस्थ झाला आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

फेब्रुवारीत बदली धोरण जाहीर झाल्यापासूनच त्याला शिक्षक वर्गाने विरोध केला आहे. बदल्या करण्यास शिक्षकांचा विरोध नाही. खो-खो पद्धतीने होणाऱ्या बदल्या थांबवा, अशी मागणी आहे. नव्या बदली धोरणात पती-पत्नी शिक्षक जोडीला प्राधान्यक्रमात स्थान दिलेले नाही. 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या पती-पत्नीला सोयीने एकत्र आणले जाणार आहे. मात्र, 30 किलोमीटरच्या आत असलेल्या जोडीचा विचार केलेला नाही. त्यामुळे सध्या सोयीत असलेल्या जोडीची गैरसोय केली जाणार का? हा प्रश्‍न अनुत्तरीच आहे. 

गेल्या तीन-चार महिन्यांत हजारो शिक्षक, शिक्षक नेते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन बदली धोरणात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी अनेक शिष्टमंडळांना सुधारणा करतो, असे आश्‍वासन दिले. काही वेळा यावर्षी बदल्यांना स्थगिती देऊ, असेही सांगितले. एका बाजूला मंत्री आश्‍वासन देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रधान सचिव असिम गुप्ता बदली प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे बदल्यांबाबतची संदिग्धता वाढली आहे. 

शिक्षकांच्या बदल्या दरवर्षीच टक्‍केवारीनुसार होतात; पण या बदली धोरणात कोणतीच टक्‍केवारी नाही. जास्त नोकरी झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकाने कमी नोकरी झालेल्या शिक्षकाला खो द्यायचा म्हणजे त्याची बदली झाली. या खो- खो प्रकाराने दरवर्षी शिक्षकांची बदली होऊ शकते, या गोष्टीलाच शिक्षक वर्गाचा विरोध आहे. नव्या बदली धोरणामुळे शिक्षक वर्गात एकल-दुकल-सुगम-दुर्गम, सेवाज्येष्ठ - सेवाकनिष्ठ - आजारी - सदृढ असे अनेक गट पडले आहेत. यातूनच त्यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. 31 मे पूर्वी होणाऱ्या बदल्या जुलै संपत आला तरी अद्याप अर्जच भरणे सुरू आहे. त्यामुळे गोंधळून गेलेल्या शिक्षकांकडून गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

Web Title: kolhapur news teacher